Tuesday, September 1, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

अक्कलकोट शहर व तालुका गुरव समाज मंडळ कडून विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करीत असलेल्या समाजातील १६ जणांना “समाजभूषण”पुरस्कार देऊन सन्मान

Admin by Admin
August 19, 2024
in सामाजिक
0
अक्कलकोट शहर व तालुका गुरव समाज मंडळ कडून विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करीत असलेल्या समाजातील १६ जणांना “समाजभूषण”पुरस्कार देऊन सन्मान
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
अक्कलकोट ( प्रतिनिधी ):- अक्कलकोट शहर व तालुका गुरव समाज मंडळ कडून विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करीत असलेल्या समाजातील १६ जणांना “समाजभूषण”पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच इयत्ता १० वी व १२ वी मधील ४० गुणवंत विध्यार्थ्यांना प्रमाणपत्र, ट्रॉपी देऊन गौरविण्यात आले.
      प्रारंभी स्वामी समर्थ व संत शिरोमणी श्री काशीबा महाराज यांचे प्रतिमा पूजन व तुळसीला जलअर्पण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या वर्षात दिवंगत झालेल्याना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. सदर कार्यक्रम माजी खा. जयसिद्धेश्वर महास्वामीजी, हभप काशिनाथ गुरव महाराज यांच्या दिव्यसानिध्यात संपन्न झाला. व्यासपीठावर आ. सचिन कल्याणशेट्टी, सोलापूर जिल्हा गुरव समाज अध्यक्ष प्रकाश मोकाशी, महिला अध्यक्षा वर्षा पाथरकर, जेष्ठ विधिज्ञ अनिल मंगरुळे, माजी नगराध्यक्ष बसलिंगप्पा खेडगी, माजी उनगराध्यक्ष महेश हिंडोळे, महिला तालुका अध्यक्ष करूणा गुरव,समिती प्रमुख संजय पाटील आदीजण उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समाज मंडळ अध्यक्ष शिवानंद फुलारी हे होते.
       यावेळी पोलीस हवालदार अशोक पाटील, चिदानंद उपाध्ये, बाबुराव पाटील, राजकुमार गुरव, सचिन मंगरुळे, अजिंक्य बिराजदार, शंकर पाटील, विठ्ठल बिराजदार, महिला पोलीस प्रियंका पाटील, व डॉ निलेश गुरव, अभियंता सागर गुरव, वळसंग ग्रा प सदस्य सुवर्णा गुरव, घुंगरेगाव सरपंच सुमन गुरव, सदस्या अनुसया गुरव, पोलीस पाटील सिद्धलिंग मुनाळे, यांनां समाजभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तसेच गुरव समाजातील अक्कलकोट शहर व तालुक्यातील तब्बल ४० विध्यार्थ्यांना ट्रॉपी, सन्मान पत्र देवून सन्मानित करण्यात आले. 
        यावेळी डॉ जयसिद्धेश्वर म्हास्वामीजीं यांचे आशीर्वाचनपर मार्गदर्शन झाले. ऍड अनिल मंगरुळे, महेश हिंडोळे, प्रकाश मोकाशी यांचे भाषणे झाले. कार्यक्रम यशस्वी साठी रमेश फुलारी, शरणप्पा फुलारी, स्वामिनाथ गुरव, दीपक गुरव, सचिन फुलारी, चंद्रकांत पुजारी, शिवानंद पुजारी, सी बी गुरव, ग्रामसेवक चंद्रकांत गुरव, बसवराज तेलगाव, राजशेखर बिराजदार, प्रशांत फुलारी, मूतणा गुरव, बसवराज फुलारी, शिक्षक बालगाव, उदय पाटील, विजय गुरव, अशोक पाटील, राजू गुरव, दत्तात्रय गुरव, आदींनी परिश्रम घेतले. प्रस्तावीक शिवानंद फुलारी, सूत्रसंचालन विद्याधर गुरव, आभार काशिनाथ फुलारी यांनी मानले.  लक्षवेधी रांगोळी उदय पाटील कुटुंबियांनी काढले होते. स्वागतगीत शिलवंती बणजगोळ यांनी तर प्रार्थनागीत रेवनसिद्ध फुलारी यांनी गायिले.

Oplus_131072
Previous Post

पोलीस प्रशिक्षण केंद्रातील नवप्रविष्ठ पोलिसांना बांधल्या राख्या

Next Post

चिकेहळळी येथील व्हिजन इंडिया प्रि स्कूलमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

Admin

Admin

Next Post
चिकेहळळी येथील व्हिजन इंडिया प्रि स्कूलमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

चिकेहळळी येथील व्हिजन इंडिया प्रि स्कूलमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (788)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157099
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697