Tuesday, September 1, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

पोलीस प्रशिक्षण केंद्रातील नवप्रविष्ठ पोलिसांना बांधल्या राख्या

Admin by Admin
August 19, 2024
in सामाजिक
0
पोलीस प्रशिक्षण केंद्रातील नवप्रविष्ठ पोलिसांना बांधल्या राख्या
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
अनोखे रक्षाबंधन : श्रीमंतयोगी युवक प्रतिष्ठान व महिला ग्रुपचा स्तुत्य उपक्रम
सोलापूर ( प्रतिनिधी ) : केगाव येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रात विविध शहर जिल्ह्यातून प्रशिक्षणासाठी आलेल्या नवप्रविष्ठ पोलिसांना राख्या बांधण्यात आल्या. श्रीमंतयोगी युवक प्रतिष्ठान व महिला ग्रुपच्या वतीने हा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. 
         नवप्रविष्ठ पोलिस है परगावी आल्याने त्यांच्या बहिणीकडून राखी बांधण्यास त्यांना अडचण येते. त्यांनाही रक्षाबंधन हा पवित्र सण साजरा करता यावा म्हणून श्रीमंतयोगी युवक प्रतिष्ठान व श्रीमंतयोगी महिला ग्रुपच्या वतीने सोलापुरात केगाव येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रात राखी बांधण्याचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.  यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राखीव पोलीस निरीक्षक दीपक लोणकर, पोलीस नाईक बँच नंबर पन्नास सुनिल रोकडे, प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष महेश कासट आदी मान्यवर उपस्थित होते.
       गेल्या सात वर्षांपासून प्रतिष्ठानच्या वतीने अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन उपक्रम घेऊन संस्कृती व परंपरा जोपासली जात आहे. यापूर्वी श्रीमंतयोगी युवक प्रतिष्ठान व श्रीमंतयोगी महिला ग्रुपच्या वतीने सोलापूर एस.टी.स्टँडमधील वाहक – चालक, रेल्वे स्टेशनमधील टी.सी,  पोस्टमन काकांना , ट्रक ड्रायव्हर  यांना राखी बांधून रक्षाबंधन  साजरा केला. येथील 55 प्रशिक्षणार्थी पोलिसांना  श्रीमंतयोगीच्या महिला ग्रुपने राख्या बांधल्या. औक्षण केले.
        सुत्रसंचालन प्रगती तिवारी यांनी केले तर आभार रंजना ढेंगले यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष महेश कासट, संतोष अलकुंटे, राजेश केकडे, केशव भैय्या, दिपक करकी, दिपक बुलबुले, महेश ढेंगले, रविशंकर जवळे, उदयशंकर जवळे, ओम बंडगर, सौरभ लकडे, स्वराज ढेंगळे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले.
— चौकट :  
नवप्रविष्ठ पोलिसांनी व्यक्त केले समाधान –
आम्ही नवप्रविष्ठ पोलिस खुप नशीबवान आहोत. बऱ्याच वेळा परगावी असल्याने आम्हाला रक्षाबंधन सण साजरा करता येत नाही. मात्र श्रीमंतयोगी युवक प्रतिष्ठान व श्रीमंतयोगी महिला ग्रुपच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात भगिनींनी राखी बांधून दीर्घायुष्यासाठी आशीर्वाद दिला. आम्ही कुठेही असलो तरी हा क्षण आठवणीत राहील.खूप आनंद व समाधान वाटले ,अशी भावना नवप्रविष्ठ पोलिसांनी व्यक्त केली.
—  चौकट : -या भगिनींनी बांधल्या राख्या
यावेळी श्रीमंतयोगी महिला ग्रुपच्या मनुश्री कासट, आर्या लचके, अनुष्का स्वामी, भक्ती सादिगले, श्रीया जवळे,  अक्षता कासट, रंजना ढेंगले, उमा मुंगड, अर्चना बंडगर, शुभांगी लचके, प्रगती तिवारी, भारती जवळे यांना राखी बांधली.

Oplus_131072
Previous Post

वंचित बहुजन आघाडी सोलापूर शहर जिल्हा आयोजित समस्त ओबीसी संघटना प्रमुखांची बैठक संपन्न

Next Post

अक्कलकोट शहर व तालुका गुरव समाज मंडळ कडून विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करीत असलेल्या समाजातील १६ जणांना “समाजभूषण”पुरस्कार देऊन सन्मान

Admin

Admin

Next Post
अक्कलकोट शहर व तालुका गुरव समाज मंडळ कडून विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करीत असलेल्या समाजातील १६ जणांना “समाजभूषण”पुरस्कार देऊन सन्मान

अक्कलकोट शहर व तालुका गुरव समाज मंडळ कडून विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करीत असलेल्या समाजातील १६ जणांना "समाजभूषण"पुरस्कार देऊन सन्मान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (788)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157099
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697