मुस्लिम एकता सामाजिक संघटनेच्या वतने मौजे चिंचपुर येथे विविध नियुक्ती.

परंडा ( फारुक शेख )
मौजे चिंचपुर ता. भुम जि धाराशीव येथे संस्थापक अध्यक्ष आसिफ भाई जमादार यांनी चिंचपुर येथे बैठक घेऊन या बैठकीत संघटनेच्या शाखा अध्यक्षपदी शाहरुख पठाण व तसेच उपअध्यक्ष सलीम पठाण, कार्याध्यक्ष अरबाज पठाण, सह कार्याध्यक्ष बद्रोद्दीन पठाण, आशा भाई शेख, सचिव सलमान पठाण, मुबारक शेख, परवेज खान, मार्गदर्शक युनुस शेख ,उस्मान शेख, मोशम पठाण, नाजम पठाण, सल्लागार आमीरखां पठाण सर्वानुमते या सर्वांची निवड करून नियुक्तीपत्र देण्यात आले.
चिंचपुर येथील सर्व युवकांचा सामाजिक कार्यामध्ये नेहमीच पुढाकार असतो. या कार्याची दखल घेऊन त्यांची नियुक्ती करण्यात आली. व तसेच सदाशिव साळवे (आप्पा) यांच्या हस्ते मुस्लिम एकता बोर्डाचे अनावरण करण्यात आले.आपण गोरगरिबाची सेवा करून मुस्लिम व बहुजनांची अन्यायाची, हक्काची, संघर्षाची लढाई एकत्र मिळून खांद्याला खांदा लावून लढु व संघटनेचे नाव महाराष्ट्रात लौकिक करू असे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले.
याप्रसंगी गौस शेख, जफर पठाण, हजरत पठाण, सनी (बाबा) पठाण, अकबर मनियार, राजु खाँन, सद्दाम शेख, ईस्राईल शेख, पप्पु पठाण, ईलाही शेख, जावेद पठाण, ईरफान पठाण, बाबुलाल शेख, सादिक शेख, व तसेच भिमराज ग्रुपचे सर्व पदाधिकारी आदी उपस्थित होते.
