राजकीय
अक्कलकोट तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या व शेतकऱ्यांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभी – खासदार प्रणिती शिंदे

सोलापूर ( प्रतिनिधी )
अक्कलकोट तालुक्यातील सर्व सामान्य कार्यकर्ता, पदाधिकारी व शेतकरी यांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभे असून पुढील काळात काँग्रेस कार्यकर्त्यांच्या अडीअडचणी सोडवून काँग्रेस पक्ष वाढीसाठी सर्वांनी मिळून नवीन संघटना बांधणी करू या असे आवहान खासदार प्रणिती शिंदे यांनी काँग्रेस भवन सोलापूर येथे आयोजित केलेल्या अक्कलकोट तालुका काँग्रेस कार्यकर्ता संवाद बैठकीत बोलताना केले.
कार्यक्रमाचे स्वागत, प्रास्ताविक सातलिंग शटगार यांनी केले.
व्यासपीठावर सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे,माजी नगराध्यक्ष डॉ. सुवर्णा मलगोंडा, माजी सभापती भीमाशंकर जमादार ,अशोकराव देवकते, जिल्हा परिषद सदस्य संजय गायकवाड, राजेंद्र गायकवाड, पंचायत समिती सदस्य विजय राठोड, सिद्धेश्वर कारखान्याचे व्हाईस चेअरमन सिद्धाराम चाकोते, जिल्हा सरचिटणीस सुदर्शन अवताडे, माजी नगरसेवक मनोज यलगुलवार,संदीप पाटील जहांगीर शेख आदी उपस्थित होते.
प्रारंभी अक्कलकोट तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांचे मनोगत ऐकून घेतले यामध्ये माजी सभापती भीमाशंकर जमादार, माजी नगराध्यक्ष सुवर्णताई मलगोंडा, जिल्हा परिषद सदस्य संजय गायकवाड, सिद्धेश्वर कारखान्याचे व्हाईस चेअरमन सिद्धाराम चाकोते, बसाण्णा लोहार , युवा नेते समाधान होटकर, अँड. पैगंबर सय्यद ही आदींनी आपले मनोगत व्यक्त करून आम्ही काँग्रेस पक्षाच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत. व पुन्हा पक्ष बांधण्यासाठी काम करू असे ठामपणे सांगितले.
आपल्या मार्गदर्शनात खासदार प्रणिती शिंदे पुढे म्हणाल्या मी लोकसभा निवडणुकीत खेड्यापाड्यात फिरत होते .मला लोक भेटत होते कामे सांगत होते. मी त्यांचे कामे करणार.
अक्कलकोट तालुक्यात दबावाचे राजकारण आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत एक लाख लोकांनी काँग्रेस पक्षाला मतदान केले आहे. अक्कलकोट तालुका हा काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला आहे. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना मी सन्मान देणार कार्यकर्ता व शेतकरी, सर्वसामान्य जनता हे माझ्यासाठी समान आहेत. त्यांच्यासाठी मी काम करत राहणार व त्यांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभी आहे. पक्षाचे पोकळी भरून काढण्यासाठी कार्यकर्त्यांनी पुढे येऊन जबाबदारी स्वीकारावी असे आवाहन त्यांनी केले. मी लोकांची काम करते व करत राहणार माझी काम करण्याची पद्धत वेगळी असून कार्यकर्त्यांनी गैरसमज करून घेऊ नये. मी तुमच्यासाठी काम करत राहणार असे त्यांनी सांगितले
यावेळी पांडुरंग राठोड, सुनील खवळे ,दिनेश शिंदे, उमाकांत येरवडे,रोहिणी गायकवाड, राजीव गायकवाड, सलाम शेख, कल्याणी कवालगी, सुधाकर पाटील, हनुमंत पाटील, राजशेखर शटगार, बसवराज शटगार, चंद्रशेखर पाटील, अनिल खिनगी, बसण्णा लोहार, उत्तमकुमार वाघमारे (कोरसेगाव) आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सोलापूर जिल्हा काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष सातलिंग शटगार यांनी केले.