Wednesday, September 2, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

दहा हजार रुपयेची वृक्षारोपण करून जागवल्या वडिलांच्या स्मृती

Admin by Admin
July 27, 2024
in सामाजिक
0
दहा हजार रुपयेची वृक्षारोपण करून जागवल्या वडिलांच्या स्मृती
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शिक्षक वृंदानी मानले आभार

नायगाव (सय्यद अजिम नरसीकर )नायगाव तालुक्यातील मौजे अंचोली येथील दानशूर व्यक्तिमत्व दत्ता बालाजी पाटील मोरे यांनी आपल्या गावातील जिल्हा परिषद शाळे विषयी असलेला जिव्हाळा वडिलांच्या स्मरणार्थ दहा हजार रुपयांची विविध प्रकारची झाडे लावून आज खरी गरज कशाची हा आदर्श पुढे ठेवला आहे.
पुण्यतिथीनिमित्त इतर बाबीवर खर्च न करता आपणच आपल्या गावात शिकलेल्या जिल्हा परिषद शाळे प्रति काहीतरी देणे लागते या उदात्त हेतूने भर पावसात खाजगी नर्सरीतून १०,००० रुपयांची विविध प्रकारची ऑक्सिजन देणारी झाडे आणून गावातील प्रतिष्ठित नागरिकांच्या हस्ते वृक्षारोपण केले आहे. कुठलाही गाजावाजा न करता अचानक रात्री झाडांनी भरलेला टेम्पो शाळेत उतरवला आणि दुसऱ्या दिवशी वृक्षारोपण केले. ते दानशूर व्यक्तिमत्व म्हणून गावात परिचित आहेत. याही पुढे शाळेसाठी योगदान देण्याचा माझा मानस आहे असे त्यांनी यावेळी व्यक्त केले आहे.
शाळेचे मुख्याध्यापक उत्तम गायकवाड अशा दानशूर व्यक्तिमत्त्वांच्या संपर्कात राहुन आपली शाळा नायगाव तालुक्यात प्रथम क्रमांकाची त्यांनी आणली आहे. यापूर्वीही मेजर विश्वंभर पाटील मोरे यांनीही सेवानिवृत्ती निमित्त शाळेत १०,००० रुपयांची झाडे लावून आपल्या गावात एक आदर्श परंपरा निर्माण केली आहे.
माजी विद्यार्थी मेळाव्याच्या निमित्ताने अनेक कर्मचारी आणि उद्योगपती शाळेच्या विकासासाठी पुढे येणार आहेत. ही स्वागतार्थ बाब आहे अशी भावना गावकऱ्यातून व्यक्त होत आहे. यावेळी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष दत्ता पाटील मोरे, उपसरपंच प्रतिनिधी अशोक पाटील मोरे, मुख्याध्यापक उत्तम गायकवाड, भारत घोरपडे, सौ. स्वाती अडबलवार व विद्यार्थी यांच्या हस्ते ही वृक्षारोपण करण्यात आले.
चौकट. –
भविष्यात सर्वांपुढे फार मोठे आव्हान ठरणार आहे कारण पर्यावरण नष्ट झाल्यामुळे ऑक्सिजनचा तुटवडा पडत आहे त्यासाठी आपल्या वडिलांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त कुठलाही वायफळ खर्च न करता महत्त्वपूर्ण पर्याय म्हणून ही झाडे लावली गेली आहेत.
दत्ता पाटील मोरे…….
चौकट. –झाडे किती महत्त्वाचे असतात यासाठी संतांनी महान समाज सुधारकांनी याचे महत्त्व पटवून दिले. कीर्तनाच्या माध्यमातून संतांनी आणि जयंती, पुण्यतिथी च्या माध्यमातून समाजसुधारकाचे कार्य सांगितले जाते पण आज झाडे लावून कृती करणे महत्त्वाचे ठरते.

Previous Post

आमदार धीरज देशमुख यांचा अन्नछत्र मंडळात सत्कार

Next Post

शिक्षकांनी दिलेल्या योगदानामुळेच  शैक्षणिक संस्थांना मोठेपण . – आमदार सचिन कल्याणशेट्टी

Admin

Admin

Next Post
शिक्षकांनी दिलेल्या योगदानामुळेच  शैक्षणिक संस्थांना मोठेपण . – आमदार सचिन कल्याणशेट्टी

शिक्षकांनी दिलेल्या योगदानामुळेच  शैक्षणिक संस्थांना मोठेपण . - आमदार सचिन कल्याणशेट्टी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (789)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (225)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157237
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697