Wednesday, September 2, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

शिक्षकांनी दिलेल्या योगदानामुळेच  शैक्षणिक संस्थांना मोठेपण . – आमदार सचिन कल्याणशेट्टी

Admin by Admin
July 27, 2024
in शैक्षणिक
0
शिक्षकांनी दिलेल्या योगदानामुळेच  शैक्षणिक संस्थांना मोठेपण . – आमदार सचिन कल्याणशेट्टी
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
कल्याणशेट्टी शिक्षण संकुलात सेवानिवृत्त शिक्षकांचा सत्कार समारंभ
अक्कलकोट ( प्रतिनिधी )शिक्षक वाचन, चिंतन, मनन करतात त्यामुळे त्यांचे व्यक्तिमत्व समाजमान्य होते. अखंड ज्ञानसाधना केल्यामुळे व्यासंग वाढतो. ज्ञानाच्या कक्षा रुंदावतात. आदर्श विद्यार्थी घडविण्याचे कार्य ते करतात. त्यांच्या कार्यामुळेच शैक्षणिक संस्थांना मोठेपण प्राप्त होते, असे प्रतिपादन आमदार सचिन  कल्याणशेट्टी यांनी व्यक्त केले. 
महर्षी विवेकानंद समाजकल्याण संस्थेतील  सौ सुरेखा कल्याणशेट्टी माध्यमिक विद्यालय व अनंत चैतन्य प्रशाला हन्नूर येथील सेवानिवृत्त शिक्षकांच्या सत्कार समारंभात ते बोलत होते. यावेळी संस्थेचे जेष्ठ संचालक मल्लिनाथ कल्याणशेट्टी, संचालिका शांभवी कल्याणशेट्टी, संचालक मुकुंद पत्की,सचिव भिमराव साठे, संचालक मल्लिकार्जुन मसुती,जेष्ठ सदस्य महावीर शहा, विज्ञान विभाग प्रमुख पूनम कोकळगी,कल्याणशेट्टी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.राजेंद्रसिंह लोखंडे, हन्नूर प्रशालेचे मुख्याध्यापक अशोक साखरे, गुरूपादप्पा आळगी आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते. 
पुढे ते म्हणाले की, शिक्षक त्यांच्या कार्यामुळे पूजनीय असतात. विद्यार्थ्यांना भविष्यकाळाची दिशा ते दाखवतात. संस्था फक्त त्यांना कार्य करण्याची संधी देत असते.
प्रारंभी  बापूजी निंबाळकर, शिवानंद पुजारी गुरुनाथ गवंडी, विलास बिराजदार, विश्वनाथ चव्हाण, निंगप्पा बिराजदार, खंडेराव घाटगे व  अ. करीम मुल्ला (लिपीक) या सर्व सेवानिवृत्त मुख्याध्यापक, पर्यवेक्षक व शिक्षकांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक मुख्याध्यापक मलकप्पा भरमशेट्टी यांनी केले. सूत्रसंचलन कल्पना स्वामी यांनी केले तर आभार मुख्याध्यापक अशोक साखरे यांनी मानले. 
चौकट –
शिक्षकांनी सेवानिवृत्तीनंतर पर्यटन करावे –
शिक्षकांनी गृहस्थाश्रमात व्यतित न होता पर्यटन करावे, योग साधना करावी, मन मुराद सहचरणीसह पर्यटनाचा आनंद घ्यावा असे संस्थेचे ज्येष्ठ संचालक मल्लिनाथ कल्याणशेट्टी यांनी आपल्या भाषणातून सांगितले. 
जीवन कृतार्थ  झाल्याची अनुभूती मिळाली. 
शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांना अध्यापन केल्यामुळे विद्यार्थी उच्च पदावर कार्य करत आहेत. ही संधी पंचप्पा कल्याणशेट्टी यांच्यामुळे मिळाली. संस्थेमुळे कुटुंबाचा विकास झाला.  त्यामुळे जीवन कृतार्थ झाल्याची अनुभूती मिळाली असे भावनात्मक उद्गार सेवानिवृत्त शिक्षकांनी यावेळी व्यक्त केले. 
Previous Post

दहा हजार रुपयेची वृक्षारोपण करून जागवल्या वडिलांच्या स्मृती

Next Post

महादेव कोगनुरे यांना विधानसभेची उमेदवारी मिळावी म्हणून सोलापूर सिध्दारामेश्वर व रूपाभवानी देवीला साकडे.

Admin

Admin

Next Post
महादेव कोगनुरे यांना विधानसभेची उमेदवारी मिळावी म्हणून सोलापूर सिध्दारामेश्वर व रूपाभवानी देवीला साकडे.

महादेव कोगनुरे यांना विधानसभेची उमेदवारी मिळावी म्हणून सोलापूर सिध्दारामेश्वर व रूपाभवानी देवीला साकडे.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (789)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (225)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157241
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697