सामाजिक
अक्कलकोट तालुक्याच्या विकासात पत्रकारांचे मोठे योगदान – आमदार सचिन कल्याणशेट्टी

अक्कलकोट ( प्रतिनिधी )अक्कलकोट शहर आणि तालुक्याचा विकास हा झपाट्याने होत आहे. अक्कलकोट शहरात विकासाची मोठ्या प्रमाणात कामे सुरू आहेत. पुढील दोन अडीच वर्षात ही सर्व कामे पूर्ण होणार असून यानंतर बदललेले चित्र पाहावयास मिळणार आहे. अक्कलकोट शहर व तालुक्यात जी विकास कामे झाली आहेत ती पत्रकारांच्या सहकार्यामुळे झाली असून अक्कलकोट तालुक्याच्या विकासात पत्रकारांचे मोठे योगदान आहे असे प्रतिपादन आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी केले.
अक्कलकोट शहरातील भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात सहा जानेवारी मराठी पत्रकार दिनाचे औचित्य साधून आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या हस्ते विविध वृत्तपत्राचे प्रतिनिधी , चॅनलचे प्रतिनिधी यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी भाजपा तालुकाध्यक्ष मोतीराम राठोड शहराध्यक्ष शिवशरण जोजन जेष्ठ नेते मल्लिनाथ स्वामी माजी जिल्हा परिषद सदस्य आनंद तानवडे आरपीआय तालुकाध्यक्ष अविनाश मडीखांबे आदींची प्रमुख उपस्थिती होती. आमदार सचिन कल्याणशेट्टी पुढे बोलताना म्हणाले, विकासाभिमुख पत्रकारिता ही नेहमीच मार्गदर्शन करत असते. पत्रकारांच्या विविध बातम्यांमुळे उणिवाचीं जाणीव होते. तालुका वासियांच्या इच्छा आकांक्षा या पत्रकारांच्या लेखणीच्या माध्यमातून समजून आल्या. त्या पूर्ण करण्याचे काम मी करत आहे .पत्रकारितेतून कौटुंबिक गरजा पूर्ण होत नाहीत पण एक आवड आणि नाद असल्याने तालुक्याच्या जडणघडणीमध्ये पत्रकारांची भूमिका ही मोलाची ठरली आहे असे शेवटी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी सांगितले. यावेळी पत्रकार मारुती बावडे बाबासाहेब निंबाळकर आनंद तानवडे अविनाश मडीखांबे आदींनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास पत्रकार नंदकुमार जगदाळे स्वामीराव गायकवाड यशवंत पाटील योगेश कबाडे रमेश भंडारी प्रशांत भगरे शिवानंद फुलारी अरविंद पाटील रविकांत धनशेट्टी चेतन जाधव सोमशेखर जमशेट्टी महेश गायकवाड दयानंद दनुरे सैदप्पा इंगळे शिवानंद गोगाव रियाज सय्यद आदित्य अंबुरे कमलाकर सोनकांबळे गौतम बाळशंकर आदी पत्रकारासह चंद्रकांत दसले नागू कलशेट्टी आदी उपस्थित होते.