भोकरदन / जालना (प्रतिनिधी )भोकरदन पंचायत समिती येथे कार्यरत असलेले ग्रा.गृह निर्माण वरीष्ठ सहाय्यक कैलास अंबादास सोनवणे यांच्या वर शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी अखिल महाराष्ट्र भोई समाज सेना प्रदेशाध्यक्ष शिवनाथ मोरे यांनी केली आहे.
मौजे हसनाबाद येथील प्रधानमंत्री घरकुल योजनेचे लाभार्थ्यांनी घरकुलांचे बांधकाम चालु केलेले असुन दुसरा हप्ता खात्यावर जमा करण्यासाठी ग्रामीण गृह निर्माण अभियंता नागे यांनी प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून घरकुल बांधकाम कामांचे फोटो एक महिन्यापुर्वी पंचायत समिती ग्रामीण गृह निर्माण विभागात दाखल केलेले असुन सदरील लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर दुसरा हप्ता जमा करणे हे कैलास अंबादास सोनवणे यांचे काम आहे. कैलास अंबादास सोनवणे यांना तिन ते चार वेळा विचारणा केली असता ते उडवा उडवीची उत्तरे देऊन अरेरावीची भाषा वापरून आम्हाला निट माहिती दिली नाही ना काय अडचण आहे.ते पण सांगत नाही. म्हणून .गटविकास अधिकारी यांनी कैलास अंबादास सोनवणे यांना शिस्त लावुन समज द्यावी अशी मागणी अखिल महाराष्ट्र भोई समाज सेना प्रदेशाध्यक्ष शिवनाथ मोरे यांनी केली आहे.






