सामाजिक

ॲड.बाळासाहेब आंबेडकर साहेब ०१ आगस्ट रोजी ठीक १२ :०० वा माजलगाव शहरात – डॉ संजय नाकलगावकर

आरक्षण बचाव यात्रा
माजलगाव ( नाजेर कुरेशी )एस सी,एस टी,ओबीसींच्या हक्काची लढाई घेऊन ॲड.बाळासाहेब आंबेडकर
२५ जुलैला दादर -मुंबईवरून निघाले आहेत.ही यात्रा ०१ आगस्ट रोजी माजलगाव साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास अभिवादन डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक या ठिकाणी आलेल्या यात्रेकरूस संबोधित करणार आहेत.आरक्षण बचाव यात्रेचे काही उद्दिष्ट त्यांनी ठरवले आहेत, ओबीसीचे आरक्षण वाचले पाहिजे.एससी एसटी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती दुप्पट झाली पाहिजे. ओबीसी विद्यार्थ्यांना एससी एसटी प्रमाणे शिष्यवृत्ती मिळते ती जशीच्या तशी लागू झाली पाहिजे. एससी एसटी व ओबीसीला पदोन्नतीत आरक्षण मिळाले पाहिजे.शंभर ओबीसी आमदार निवडून आणणे. आणि ५५ लाख बनावट कुणबी प्रमाणपत्रे रद्द करण्यात यावीत. अशा प्रकारचे उद्दिष्ट या आरक्षण बचाव यात्रेमध्ये असणार आहेत.ही यात्रा मुंबई ते संभाजीनगर अशी असणार असून संभाजीनगरला याचे समारोप होणार आहे ही यात्रा व्यवस्थित मार्गक्रमण होणेसाठी सकल ओबीसी,एनटी एसटी एससी संघटना व समाजा तर्फे आवाहन करण्यात येते की आपण ०१ ऑगस्ट दुपारी १२ वा माजलगाव शहरात येऊन या आरक्षण बचाव यात्रेत बहुसंख्येने सहभागी व्हावे. असे आवाहन वंचित बहुजन आघाडी माजलगाव तालुकाध्यक्ष डॉ संजय नाकलगावकर यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button