शैक्षणिक

सोलापूर जिल्हा परिषदेला मिळाले शंभर टक्के अंध शिक्षणाधिकारी ; घेतला पदभार

 

सोलापूर – सोलापूर जिल्हा परिषदेच्या इतिहासात बहुतेक महाराष्ट्रात पहिल्यांदाच एक शिक्षणाधिकारी म्हणून शंभर टक्के अंध व्यक्ती मिळाला आहे. जिल्हा परिषदेच्या योजना शिक्षणाधिकारी पदावर साताऱ्याचे सुजित शिंदे यांनी पदभार घेतला आहे.
ते MPSC मधून वर्ग एकचे अधिकारी म्हणून उत्तीर्ण झाले आहेत. सोमवारी त्यांनी झेडपी अध्यक्ष दिपक वैद्य, उपाध्यक्ष इंद्रजीत पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी जैन तसेच अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कोहिनकर, शिक्षण सभापती चेतनसिंह केदार यांच्या भेटी घेतल्या.
सर्वांनी शिंदे यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देताना सहकार्याची भावना व्यक्त केली.
शिक्षणाधिकारी शिंदे हे अंध असल्याने त्यांना प्रशासनाकडून कामकाजात सहकार्य करण्यासाठी एक पूर्णवेळ विश्र्वासातील कर्मचारी देण्यात येणार आहे. तो सांगेल तिथे शिंदे हे सही करतील त्यामुळे सर्व जबाबदारी संबधित त्या कर्मचाऱ्याची राहणार आहे. कागदपत्र हे शिक्षणाधिकारी यांना वाचता यावेत म्हणून साधारण एक लाखापर्यंतची मशीन घेण्याची मागणी शिंदे हे प्रशासनाकडे करणार असल्याचे सांगण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button