सामाजिक
अक्कलकोट शहर व तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी यांचा सत्कार

अक्कलकोट: (प्रतिनिधी)
राजा छत्रपती शिवाजी महाराज चौक बसस्थानक येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याचा ठराव आमदार- सचिन कल्याणशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली व नगराध्यक्ष- मिलन कल्याणशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली मंजूर करण्यात आला. या बद्दल अक्कलकोट शहर व तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने सत्कार सोहळा जुने तहसील कार्यालय, नेहरू गल्ली येथील आमदार कार्यालयात संपन्न झाला.
दरम्यान नगराध्यक्ष- मिलन कल्याणशेट्टी, उपनगराध्यक्ष- ऋतुराज तथा बंटी राठोड, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा राजा छत्रपती शिवाजी महाराज चौक बसस्थानक येथे उभा राहवा या करिता गेल्या कांही वर्षापासून प्रयत्न करत असलेले समाज बांधव व नगरसेवक- तम्मा शेळके यांचा सत्कार सकल मराठा समाजाच्या वतीने मनाचा फेटा, शाल, पुष्प गुच्छ देऊन संपन्न झाला.
या प्रसंगी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले, श्री वटवृक्ष स्वामी महराज देवस्थान चे अध्यक्ष महेश इंगळे, अमर पाटील, बाळासाहेब घाटगे, प्रथमेश इंगळे, संजय मोरे, मनोज निकम, नगरसेवक अशोक जाधव, नन्नु कोरबू, नागराज कुंभार, सिद्धाराम टाके, अभिषेक लोकापुरे, राहुल काळे यांच्या सह अक्कलकोट शहर व तालुका सकल मराठा समाज आदिजण बहुसंख्येने उपस्थित होते.
गेल्या अनेक वर्षापासूनची मागणी पूर्ण होत आहे, या बाबत समाज बांधवातून समाधान व्यक्त होत असून, शिवरायांचा जय घोष अक्कलकोटचा अभिमान, आयरलाड मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती उभी राहणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र स्मृतीस वंदन करत अक्कलकोटच्या भूमीवर स्वाभिमानाचा इतिहास पुन्हा उज्वल होणार, छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आणि स्वाभिमानाची ज्योत कायम पेटती राहो, छत्रपतींची प्रेरणा स्वाभिमानाची राजधानी श्री क्षेत्र अक्कलकोट मध्ये विकासाचा संकल्प हाती घेण्यात आला आहे. या बद्दल समाज बांधवाच्या वतीने या वेळी आमदार सचिन कल्याणशेट्टी व नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी यांचे आभार व्यक्त करण्यात आले. लवकरच छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात येणार आहे. या बाबतची सर्वती पुर्तता करण्यात आलेली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्य आणि पराक्रमाची आठवण सदैव जागवणारा हा निर्णय देशाच्या इतिहासात मानाचा ठरेल. या एैतिहासिक निर्णयाने तालुका व शहरवासीयांसाठी अभिमानाचा आणि आनंदाचा क्षण असल्याची भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली.




