सामाजिक
नगराध्यक्ष ,मुख्याधिकारी आणि पोलीस निरीक्षक यांना वंचित बहुजन आघाडी अक्कलकोटच्या वतीने निवेदन

अक्कलकोटमध्ये महामानवांचे पुतळे बसवा ,
अक्कलकोटमधील अवैद्य धंदे बंद करा
अक्कलकोट (प्रतिनिधी)-अक्कलकोट नगरपरिषदेच्या वतीने सर्वसाधारण सभेमध्ये अक्कलकोट शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्याच्या संदर्भात एकमताने ठराव झाला. अक्कलकोट शहरात प्रथमच छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवत आहेत त्याबद्दल वंचित बहुजन आघाडी अक्कलकोट शहर व तालुक्याच्या वतीने नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी आणि मुख्याधिकारी रमाकांत डाके यांचा अभिनंदन करून, महाराष्ट्र व भारतासाठी अनेक महत्त्वाच्या महापुरुषांनी आपल्या आयुष्याची राख रांगोळी करून घेतली समाजाला एक दिशा दिली . महात्मा बसवेश्वर महाराज , राजमाता अहिल्याबाई होळकर ,महात्मा ज्योतिबा फुले , डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ,लोकशाहीर आण्णाभाऊ साठे अशा महामानवांचे पुतळा अक्कलकोट शहरात बसविण्यात यावा आणि सामाजिक एकताचा संदेश या अक्कलकोट सारख्या शांतता प्रिय गावात रुजवावा यासाठी अक्कलकोट वंचित बहुजन आघाडी शहर व तालुक्याच्या वतीने नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी आणि मुख्याधिकारी रमाकांत डाके यांना निवेदन देण्यात आले.
त्याचप्रमाणे उत्तर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अविनाश पवार साहेब यांना अक्कलकोट तालुक्यातील व शहरातील मटका जुगार दारूचे अड्डे व इतर अवैध धंदे बंद करा यामुळे अनेक गोरगरिबांचे संसार उध्वस्त होत आहेत लहान मुला बाळांच्या शिक्षणावर परिणाम होत आहे श्री स्वामी समर्थांच्या पुण्यनगरीमध्ये अशा प्रकारच्या धंद्यांना एक प्रकारचा उत आला असून ते त्वरित बंद करावा अन्यथा पोलीस स्टेशन समोर उग्र स्वरूपाचा आंदोलन वंचित बहुजन आघाडी अक्कलकोटच्या शहर व तालुक्याच्या वतीने करण्यात येईल असा इशारा या निवेदनात देण्यात आला.
याप्रसंगी जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर मढीखांबे, जिल्हा उपाध्यक्ष देवानंद अस्वले , तालुका अध्यक्ष विशाल ठोंबरे, भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष साहिल कांबळे, युवक आघाडी शहराध्यक्ष संदीप बाळशंकर, तालुका महासचिव नागेश हारवालंकर, तालुका उपाध्यक्ष अमृत सोनकांबळे, तालुका उपाध्यक्ष यशवंत शेठ इंगळे, तालुका उपाध्यक्ष माणिक गायकवाड, शहर उपाध्यक्ष शिवाजी चौगुले, युवक आघाडी तालुका प्रसिद्धीप्रमुख विश्वजीत भालेराव व अन्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.




