सामाजिक
अक्कलकोट लायन्स क्लबतर्फे ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान

अक्कलकोट ( प्रतिनिधी )लायन्स क्लब ऑफ अक्कलकोट यांच्या वतीने ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करण्यात आला.
“ज्येष्ठांचा सन्मान म्हणजे संस्कारांचा सन्मान!” याप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांचां सन्मान करण्यात आला.
या ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान लायन्स क्लब ऑफ अक्कलकोटचे अध्यक्ष ला. अभय खोबरे यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी ला. राजेंद्र हत्ते, ला. मल्लिनाथ साखरे, ला. प्रभाकर मजगे, सचिव ला. शिरीष पंडीत, सहसचिव ला. शिवशरण खुबा, खजिनदार ला. विठ्ठल तेली,
ला. शदीद वळसंगकर आदी उपस्थित होते.
सन्मानित ज्येष्ठ नागरिक गुलाब मेहबूब तडमोड ,
प्रभावती भरतकुमार आळंद , सुवर्णा सुरेश आळळे ,
सिद्धया रुद्रया स्वामी , साहेबराव उमाजी लवटे ,
कमळाबाई जाक्काप्पा कोडलंगीकर ,
महादेवी काशिनाथ भालके , कस्तुराबाई कस्तुरबा उमराणीकर , शांताबाई सुरेश फुटाणे ,महानंदा राजशेखर कडगंची, सुभाष गणपतराव विभूते ,
गुरुलिंगप्पा रेवप्पा येळमेली आदींचा सन्मान करण्यात आला.



