सामाजिक
ईद-ए-मिलादून नबी निमित्त अक्कलकोट तालुका युवक मुस्लिम समाजाच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर व कर्करोग निदान शिबीराचे आयोजन

अक्कलकोट ( प्रतिनिधी )
ईद-ए-मिलादून नबी निमित्त अक्कलकोट तालुका युवक मुस्लिम समाजाच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर व सोलापूर कॅन्सर सेंटर हॉस्पिटल तर्फे मोफत आरोग्य व कर्करोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते सोहेल फरास यांनी दिली.
मागच्या वर्षी ईद-ए-मिलादून नबी निमित्त आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराला अक्कलकोट शहर व तालुक्यातील नागरिकांनी आणि रक्तदात्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. त्या रक्तदात्यांनी केलेल्या रक्तदानामुळे संपूर्ण वर्षभरात अनेक गरजू रुग्णांना वेळेवर रक्ताची पिशवी उपलब्ध करून देता आली.सदरचे भव्य रक्तदान शिबीर
दिनांक : बुधवार, २६ ऑगस्ट २०२६
ठिकाण :नगरपरिषद उर्दू शाळा न.२, कारंजा चौक, अक्कलकोट येथे आयोजित करण्यात आले आहे.
अक्कलकोट शहर व तालुक्यातील ज्या गरजू व्यक्तींना रक्ताची आवश्यकता होती, त्यांनी आम्हाला संपर्क केल्यानंतर माणुसकीच्या नात्याने त्यांच्या गरजेप्रमाणे रक्त उपलब्ध करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला असल्याची माहिती सोहेल फरास यांनी दिली.
अक्कलकोट शहर व तालुक्यातील तरुणांनी आणि रक्तदात्यांनी मोठ्या संख्येने रक्तदान शिबिरात सहभागी होऊन रक्तदान करून या माणुसकीच्या कार्याला सहकार्य करावे असे आवाहन अक्कलकोट तालुका युवक मुस्लिम समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.



