अक्कलकोट तालुक्यातील ममदाबाद येथील जिल्हा परिषद कन्नड शाळेत भारतीय लहुजी सेनेतर्फे शैक्षणिक साहित्य वाटप

अक्कलकोट (प्रतिनिधी ): भारतीय लहूजी सेनेचे जिल्हाध्यक्ष वसंत देडे यांच्याकडून अक्कलकोट तालुक्यातील ममदाबाद जिल्हा परिषद शाळेत शैक्षणिक साहित्य व खाऊचे वाटप करण्यात आले. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शरणराज केंगनाळकर यांच्या हस्ते शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहरप्रमुख राम जाधव, अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हाप्रमुख एम. मुलाणी, तालुकाप्रमुख आयाज जमादार, राजू चौगुले, फुलचंद पवार, मलकप्पा बिराजदार, उपसरपंच रामचंद्र बिराजदार, सिद्धू पाटील, कोमणा पाटील, गौराबाई बिराजदार, मुख्याध्यापक प्रभाकर, भारतीय लहूजी सेनेचे अक्कलकोट तालुकाध्यक्ष अनिल झंपले आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी शरणराज केंगनाळकर यांनी वसंत देडे यांच्या उपक्रमाचे कौतुक केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक भारतीय लहुजी सेनेचे जिल्हाध्यक्ष वसंत देडे यांनी केले. या कार्यक्रमास ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते.




