महाराष्ट्र

शरद पवारांची सदिच्छा भेट; विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सकारात्मक चर्चा

अक्कलकोट – ( प्रतिनिधी )
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा ज्येष्ठ नेते शरद पवार यांची सागर सोनकांबळे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने  सदिच्छा भेट घेत विद्यार्थ्यांच्या व शिक्षण क्षेत्रातील विविध महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा केली.
या भेटीदरम्यान बार्टी (BARTI), सारथी (SARTHI), महाज्योती (MAHAJYOTI) आणि टीआरटीआय (TRTI) या स्वायत्त संस्थांमधील संशोधक विद्यार्थ्यांच्या वयोमर्यादेत वाढ करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच पीएचडीधारक संशोधक विद्यार्थ्यांची संख्या १०० वरून ७०० करण्यात यावी, स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण करणाऱ्या सर्व स्वायत्त संस्थेची वयोमर्यादा वाढावावी अशी आग्रही मागणी पवार यांच्यासमोर मांडण्यात आली.
यावेळी अक्कलकोट तालुक्यातील बबलाद येथील जिल्हा परिषद शाळेतील दुर्घटनेची सद्यस्थिती व संबंधित माहितीही शरद पवार यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली.
विद्यार्थी व शिक्षण क्षेत्राशी संबंधित सर्व विषय ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी गांभीर्याने ऐकून घेतले असून, संबंधित प्रश्नांवर सकारात्मक मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिल्याचे सागर सोनकांबळे यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आपला लढा यापुढेही सुरूच राहणार असल्याचे सोनकांबळे यांनी यावेळी स्पष्ट केले
शिष्टमंडळामध्ये गणेश गायकवाड, विठ्ठल बोकन उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button