सामाजिक

ईद-ए-मिलादुन्नबीपूर्वी वीजपुरवठा सुरळीत आणि जुलूस मार्गावरील खड्डे बुजवा

अक्कलकोट मुस्लिम युवक संघटनेचे महावितरण व नगरपालिका प्रशासनाला निवेदन.
अक्कलकोट ( प्रतिनिधी )दि. २६ ऑगस्ट रोजी ईद-ए-मिलादुन्नबी अर्थात पैगंबर जयंतीनिमित्त अक्कलकोट शहरात मोठ्या उत्साहात विविध धार्मिक कार्यक्रम, जुलूस,मिरवणूक तसेच सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 
या पार्श्वभूमीवर जुलूस मिरवणूक मार्गावरील खड्डे तातडीने बुजवून रस्ते सुरक्षित करावेत तसेच शहरातील वीजपुरवठा अखंडित व सुरळीत ठेवावा, अशी मागणी अक्कलकोट मुस्लिम युवक संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.

यावेळी शुकूर शेख, दाता बळोरगी, सोहेल फरास, इरफान दावना, रशीद खिस्तके, सैपन शेख, सैपन हगलदिवटे, मुबारक कोरबु, रजाक शेख,अकिब बागवान, बाबा पठाण, कायुम बेपरी, इम्रान हगलदिवटे,समीर शेख, अकिल मुजावर, पालडे आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button