सामाजिक

परंड्याचे सुपुत्र गजानन मुळे यांची पोलीस उपनिरीक्षकपदी पदोन्नती; माहिती अधिकार कार्यकर्ते महासंघाकडून सत्कार

 

परंडा / धाराशिव ( फारूक शेख )
परंडा येथील रहिवास आणि कर्तबगार पोलीस अंमलदार गजानन मुळे यांची पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदी पदोन्नती झाल्याबद्दल माहिती अधिकार कार्यकर्ते महासंघ, परंडा यांच्या वतीने त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला. मुळे यांच्या या यशामुळे आणि त्यांच्या प्रदीर्घ सेवाकार्यामुळे संपूर्ण परंडा तालुक्यातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.जिल्हा परिषद शाळेतून सुरुवात ते खाकीचा प्रवासगजानन मुळे यांचे प्राथमिक शिक्षण परंडा येथील जिल्हा परिषद शाळेत झाले. १ जानेवारी १९९३ रोजी ते पोलीस दलात भरती झाले. भरती झाल्यानंतर त्यांची पहिली नियुक्ती धाराशिव मुख्यालय येथे झाली. त्यानंतर त्यांनी १९९५ मध्ये वाशी, २००० मध्ये ढोकी, २००६ ते २००८ धाराशिव (उस्मानाबाद), २००८ ते २०१४ भूम आणि २०१५ ते २०२२ या काळात आंबी पोलीस ठाण्यात अत्यंत उल्लेखनीय सेवा बजावली. २०२२ पासून ते पुन्हा परंडा येथे कार्यरत असतानाच, १६ जून २०२६ रोजी त्यांच्या उत्कृष्ट सेवेची दखल घेत शासनाने त्यांना पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदी पदोन्नती दिली.भूकंप असो वा यात्रा; कर्तव्य चोख बजावलेगजानन मुळे यांनी आपल्या ३३ वर्षांच्या प्रदीर्घ सेवाकाळात अनेक कठीण प्रसंगात उत्तम कामगिरी केली. ऐतिहासिक किल्लारी भूकंपाच्या वेळी त्यांनी तेथे अत्यंत संवेदनशीलतेने बंदोबस्त आणि देखरेखीची ड्युटी सांभाळली म्हणून पुस्कार भेटलेले होते . परंडा तालुक्यातील सोनारी येथील प्रसिद्ध श्री भैरवनाथ देवाच्या मोठ्या यात्रेदरम्यान लाखो भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून त्यांनी अहोरात्र कर्तव्य बजावले. यात्रेकरूंना मदत करत त्यांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यात मोठे योगदान दिले.मोठ्या चोऱ्यांचा तपास अन् गुन्हेगारांना बेड्याआपल्या सेवाकाळात मुळे यांनी अनेक क्लिष्ट आणि मोठ्या चोऱ्यांचा छडा लावून आरोपींना जेरबंद केले. त्यांच्या याच शोधक वृत्तीमुळे आणि कर्तव्यनिष्ठेमुळे सध्या परंडा आणि आंबी पोलीस ठाण्याच्या हद्दीत त्यांच्या कामाची मोठी चर्चा होत आहे. त्यांच्या याच प्रामाणिक कष्टामुळे आज ते अधिकारी पदावर पोहोचले आहेत.माहिती अधिकार महासंघाकडून गौरवत्यांच्या या यशाची दखल घेऊन माहिती अधिकार कार्यकर्ते महासंघ, परंडा यांच्या वतीने एका विशेष कार्यक्रमात मुळे यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. या प्रसंगी महासंघाचे पदाधिकारी, कार्यकर्ते फारूक शेख . कानिफनाथ सरपने . विजय मेहेर . जमीर शिकलकर . अमित आगरकर . असलम पल्ला . आलिम शिकलकर . रावसाहेब गायकवाड . सुनील पवार शिवाजी करळे .धनजय गोफने .आणि परंडा परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button