सामाजिक
आरक्षण एकता समितीच्या वतीने अनुसूचित जातीच्या अ ब क ड उपवर्गीकरणाच्या विरोधात धरणे आंदोलन

सोलापूर ( प्रतिनिधी ) सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या संभ्रम अवस्थेत असलेल्या महाराष्ट्र शासनाने बदर एकल समिती उपवर्गीकरणाच्या अभ्यासासाठी नेमलेली होती. परंतु सदर एकल समिती अनुसूचित जातीतील कोणत्याही जातीवर्गाचा अभ्यास न करता, चर्चा न करता, तक्रारी ऐकून न घेता जे उपवर्गीकरण करून महाराष्ट्रामधील अनुसूचित जातीमध्ये तोडफोड करून त्यांच्यामध्ये भांडणे लावण्याचे जे षडयंत्र चालू आहे, त्या विरोधात २७ जून रोजी सोलापूर जिल्हा परिषद,पूनम गेट या ठिकाणी धरणे आंदोलन आरक्षण एकता समितीच्या वतीने आयोजित केले गेले होते. सदर आंदोलनाची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून करण्यात आली. आंदोलनाची रूपरेषा आरक्षण एकता समितीचे निमंत्रक आप्पासाहेब लोकरे यांनी केले. यानंतर आयु. आगावणे , सच्चिदानंद व्हटकर, राजकुमार कांबळे , मातंग समाजाचे नितीन कांबळे , मेजर शिवपुत्र घटकांबळे, तुकाराम कांबळे , बाबुराव इंगळे , वामन धूळराव, फारुख शेख, अंगद मुके ,राजरत्न फडतरे , सनके वकील, श्रीमती धुळराव , श्वेताताई राजगुरू, दीप्ती माने इत्यादींनी आपल्या विचारातून अ ब क ड उपवर्गीकरणाचा निषेध केला. शेवटी सुनील डांगे यांनी कार्यक्रमातील मान्यवराचे आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राचार्य सिद्धार्थ जाधव, मच्छिंद्र अंगुले , नागेश माने ,रॉबर्ट गौडर, एडवोकेट श्रीकांत बनसोडे ,माजी आय इ एस अधिकारी शैलेंद्र सरवदे , अविनाश शिंदे , योगेश गायकवाड, ,इरेश मब्रुबखाने इत्यादीने सहकार्य केले.




