सोलापूर महानगरपालिका शाळ नं २ बंद करु नये –शिंदे यांची मागणी

सोलापूर (रमेश सुरवसे): सोलापूर महानगरपालिका शाळा नं २.बंदकरु नये अशी मागणी जिल्हाधिकारी सोलापूर यांच्या कडे निवेदना द्वारे केली आहे.अशी माहिती काँग्रेस पक्षाचे शहर उपाध्यक्ष भिमराव शिंदे यांनी दिली
. दिनांक ११ जून रोजी शिष्टमंडळाद्वारे जिल्हाधिकारी कार्यालयातील नायब तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात शिंदे यांनी म्हटंलेआहे की, सोलापूर महानगरपालिका हद्दीतील बुधवार पेठ विभागातील सोलापूर महानगरपालिकेच्या प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा क्रमांक २,१६,२१, अशा तीन शाळा कार्यरत आहेत शाळा ह्या मागील साठ वर्षापासून असून या शाळेत मागासवर्गीय तसेच इतर समाजाचे विद्यार्थी मोठ्या प्रमाणात शिक्षण घेऊन उच्च पदापर्यंत पोहोचले आहेत
शासनाने नुकतेच एक परिपत्रक काढून एका वर्गास२०, विद्यार्थ्यांची संख्या असेल तर शाळा चालू ठेवण्याचे बंधन घातले
आहे यामुळे सदर शाळा बंद करून मनपाच्या इतर शाळेत वर्ग करण्याचा घाट घातला जात आहे त्यामुळे मागासवर्गीय विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार आहेत त्यामुळे मनपाची २, नंबर शाळा बंद करू नये अशी शिंदे यांची मागणी आहे अशा प्रकारे सदरचे निवेदन सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच खासदार प्रणिती शिंदे, मनपाचे आयुक्त डॉक्टर सचिन ओबांसे यांना दिले आहे
यावेळी सचिन सुरवसे, आकाश वाघमारे, चिंटू कांबळे, चंद्रकांत टिपके आदी उपस्थित होते.



