सोलापूर येथील कवी माधव पवार यांचे निधन

सोलापूर : कवी माधव रा. पवार यांची प्राणज्योत बुधवारी, ०६ मे रोजी पहाटे चार वाजता राहत्या निवासस्थानी मालवली. त्यांच्या बुधवारी, सायंकाळी ४ वा. त्यांची अंत्ययात्रा निर्मिती टॉवर्स, मोदीखाना येथील त्यांच्या राहत्या घरापासून निघणार आहे. त्यांच्यावर मोदी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांच्या निधनानं मराठी साहित्य पटलावरील एक तारा निखळल्याची भावना व्यक्त केली जात आहे. मृत्यू समयी त्यांचे वय ७२ होते.
एक संवेदनशील कवी, उत्तम तक्ते, नकलाकार, उत्कृष्ट सूत्रसंचालक म्हणून उभ्या महाराष्ट्राला अन् ते सोलापूरकरांना त्यांची ओळख होती. कवी रा.ना. पवार यांचे सुपुत्र म्हणून ओळखीशिवाय कवी माधव पवार यांच्या प्रतिभेचा नावलौकिक साहित्य दरबारात विशेष होता.
त्यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या होत्या. यांच्यावर तब्बल १६०० डायलिसिस करण्यात आल्याचे समजते.
हे शुभ शकुनाचे पक्षी’ कविता संग्रहास महाराष्ट्रातील सन्मानाचे ११ पुरस्कार, ‘गरुडभरारी’ काव्यसंग्रह. याशिवाय अनेक नामवंत पुरस्कारांनी सन्मानित.
पार्श्वगायक गायक प्रल्हाद शिंदे, त्यांचे पुत्र आनंद, नातू आदर्श शिंदे तिन्ही पिढ्यांसह दिग्गजांनी गायली त्यांची गाणी.
वात्रटिकाकार रामदास फुटाणे, कविवर्य फ.मुं. शिंदे, गजलकार सुरेश भटांसह दिग्गजांशी स्नेह.



