महाराष्ट्र

 ट्रम्प- मोदी संबंधांवर ॲड. प्रकाश आंबेडकर यांची घणाघाती टीका

मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अत्यंत परखड शब्दांत निशाणा साधत, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोर मोदी सरकारने देशाच्या सार्थक धोरणाचे समर्पण केल्याचा गंभीर आरोप केला आहे.

सोशल मीडियावर केलेल्या ट्विटमध्ये ॲड. आंबेडकर यांनी “थूकून चाटणे म्हणजे काय, हे मोदींच्या भूमिकेत दिसले; ट्रम्प यांनी थुंकले आणि मोदींनी चाटले,” अशा तीव्र शब्दांत टीका करत कथित राष्ट्रवादावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची थूक चाटायची आणि देशात राष्ट्रवादाच्या गप्पा मारायच्या, हा कसला राष्ट्रवाद?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

या ट्विटमध्ये त्यांनी भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि प्रचारक राम माधव यांच्या वक्तव्याचा उल्लेख करत, त्या विधानामुळे मोदी यांनी ट्रम्प यांच्यापुढे भारताची अर्थपूर्ण आणि स्वायत्त धोरणे समर्पित केल्याचे स्पष्ट झाल्याचा दावा केला.

ॲड. आंबेडकर यांनी पुढे अत्यंत गंभीर आरोप करत पंतप्रधान मोदी यांना अमेरिका वैयक्तिक पातळीवर ब्लॅकमेल करत असल्यामुळेच हा तडजोडीचा मार्ग स्वीकारला गेला, असा आरोप केला. “मोदी कॉम्प्रोमाइज्ड आहेत,” असे म्हणत त्यांनी या परिस्थितीला राष्ट्रीय सार्वभौमत्वासाठी धोकादायक ठरवले.

पुढे त्यांनी इशारा देत म्हटले की, “अशा प्रकारे तडजोडीच्या भूमिकेत असलेले पंतप्रधान देशाला पुन्हा गुलाम बनवू शकतात,” असा गंभीर आरोप त्यांनी केला.या ट्विटमधून ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी मोदी सरकारच्या परराष्ट्र धोरणावर, राष्ट्रवादाच्या दाव्यांवर आणि अमेरिकेसोबतच्या संबंधांवर एकाचवेळी बहुआयामी आणि आक्रमक टीका केली असून, त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगण्याची शक्यता आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button