महाराष्ट्र

नोबेल पुरस्कार विजेते कैलास सत्त्यार्थी यांच्याशी जनमेजयराजे भोसले यांनी साधला संवाद

अक्कलकोट : (प्रतिनिधी)
नोबेल पुरस्कार विजेते कैलास सत्त्यार्थी यांना पुणे येथे मासटर दिनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने नुकताच ‘लता दिनानाथ मंगेशकर’ पुरस्कार २०२६ देण्यात आला. याप्रसंगी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांनी त्यांच्या बरोबर संवाद साधण्यात आला.
पुण्यातील गणेश कला क्रीडा मंदिरात सदरचा पुरस्कार सोहळा संपन्न झाला. यावेळी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांनी कैलास सत्यार्थी यांनी श्रीक्षेत्र अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळास सदिच्छा भेटीचे निमंत्रण देऊन, अन्नछत्र या न्यासाच्या माध्यमातून धार्मिक कार्याबरोबरच सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा यासह वसुंधरेची जपणूक, समर्थ महाप्रसाद सेवा, कुस्तीगिरांसाठी खुराकाचे वाटप अशी विविध कामे करीत असल्याचे सांगून, यासह भाक्ताभिमुख विविध उपक्रमांची माहिती जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांनी कैलास सत्यार्थी यांना दिली असता सत्यार्थी यांनी प्रशसनीय कार्याची माहिती घेतल्यानंतर त्यांनी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाची भेट देण्याची इच्छा व्यक्त करून, तीर्थक्षेत्र नगरी अक्कलकोट को जरूर आऊंगा असे यावेळी सत्यार्थी यांनी यावेळी सांगितले.*
यावेळी अन्य विजेत्यांमध्ये महेश काळे, शमा भाटे, सुबोध भावे, प्राजक्ता माळी, सुशील कुलकर्णी, अच्युत गोडबोले, डॉ.धनंजय केळकर, आनंद भागवत, मोहन आगाशे कार्यक्रमाचे अध्यक्ष सकाळ समुहाचे प्रतापराव पवार यांची देखील जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले  यांनी भेट घेऊन संवाद साधले असता उभयंतानी कार्याची प्रशंसा करून आम्हाला आपल्या कार्याची माहिती आहे, आम्हाला यायचे आहे. अशी इच्छा यावेळी व्यक्त केली. याप्रसंगी गायक महेश काळे यांनी तर श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या वर्धापन दिन आणि श्री गुरुपौर्णिमा उत्सवाचा सांस्कृतिक कार्यक्रम सेवा केलो असल्याचे उपस्थित विजेत्यांना सांगून, खरोखरच ब्रम्हांडनायक श्री स्वामी समर्थ महाराज जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले व न्यासाचे प्रमुख कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्याकडून धार्मिक कार्याबरोबरच विविध कार्येही करून घेत असल्याची प्रचिती श्रीक्षेत्र अक्कलकोट निवासी अन्नछत्र स्थळी पाहायला मिळत असल्याचे महेश काळे यांनी यावेळी सांगितले असता सर्वांनी भोसले पिता-पुत्राच्या कार्याबद्दल प्रशंसनीय गौरव उदगार यावेळी काढले. सर्वांना येण्याचे निमंत्रण जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांनी दिले असता जरूर येणार असल्याचे सांगण्यात आले. या प्रसंगी पंडित हृदयनाथ मंगेशकर उषाताई मंगेशकर, श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे सचिव शामराव मोरे, खजिनदार लाला राठोड, विश्वस्त भाऊ कापसे, शिरीष रायरीकर, रविंद्र जोशी हे उपस्थित होते.
या कार्यक्रमास प्रा.सायबन्ना जाधव, शिवराज स्वामी, सरफराज शेख, महांतेश स्वामी, संतोष माने, कुणाल भालेकर, सागर याळवार, असद फुलारी, दणके हे उपस्थित होते.
यावेळी मी लता-आशा दिनानाथ सादरकर्ते पंडित हृदयनाथ मंगेशकर लता मंगेशकर व आशा भोसले यांच्या गाण्याचा विशेष कार्यक्रम संपन्न झाला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button