जि.प. शिक्षक विकास घोडके यांना ‘प्रेरणास्तंभ’ पुरस्कार प्रदान; अमरसिंह पंडित यांच्या हस्ते गौरव

गेवराई (प्रतिनिधी):
कास्ट्राइब कर्मचारी कल्याण महासंघातर्फे दरवर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून दिले जाणारे मानाचे ‘प्रेरणास्तंभ’ आणि ‘कृतज्ञता सन्मान’ पुरस्कार नुकतेच प्रदान करण्यात आले. या मध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, नंदपूर येथील उपक्रमशील शिक्षक विकास भिकचंद घोडके यांना त्यांच्या शिक्षण क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल ‘प्रेरणास्तंभ पुरस्कारा’ ने सन्मानित करण्यात आले.राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस आदरणीय अमरसिंह पंडित यांच्या शुभहस्ते आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा उत्साहात पार पडला.
कास्ट्राइब कर्मचारी कल्याण महासंघाचे केंद्रीय अतिरिक्त सचिव बापूसाहेब ससाणे यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी या पुरस्कारांचे आयोजन केले जाते. समाजात आदर्श काम करणाऱ्या व्यक्तींना आणि विशेषतः शिक्षण क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या शिक्षकांना प्रोत्साहन देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. याही वर्षी अमरसिंह पंडित यांनी आपली उपस्थिती दर्शवून पुरस्कारार्थींचा गौरव केला.
या गौरव सोहळ्याला तालुक्यातील विविध क्षेत्रांतील पदाधिकारी, शासकीय कर्मचारी आणि शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रामुख्याने:
खेर्डावाडी केंद्र: केंद्रप्रमुख सवासे सर, केंद्र मुख्याध्यापक पवार सर, विश्वभूषण सोनवणे सर आणि केंद्रातील सर्व शिक्षक.विकास घोडके सरांना मिळालेल्या या पुरस्कारामुळे नंदपूर आणि पाडळसिंगी ग्रामस्थ, शिक्षक वर्ग, नातेवाईक आणि मित्रमंडळींनी त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.नंदपुर गावातील उपसरपंच शेख फत्तु मामु,भाजपा अल्पसंख्याक तालुका उपाध्यक्ष शेख बंन्नुपटेल ,शेख तैमुर,शेख वाहेद,यांनी पुरस्कार मिळाल्याबद्दल घोडके सरांचे अभिनंदन केले.
पुरस्काराला उत्तर देताना घोडके सर म्हणाले की, “हा सन्मान माझ्या एकट्याचा नसून माझ्या शाळेतील विद्यार्थी, सहकारी आणि मला साथ देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा आहे.” त्यांनी या निवडीबद्दल संयोजक समिती, उपस्थित मान्यवर, खेर्डावाडी केंद्रातील सहकारी आणि ग्रामस्थांचे मनापासून आभार व्यक्त केले.



