सोलापूर

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून रासकम. संघटनेच्या वतीने अभिवादन 

  सोलापूर ( रमेश सुरवसे )भारतीय संविधानाचे शिल्पकार बहुजनांचे मुक्तिदाते विश्वभूषण भारतरत्न ” डॉ.बाबासाहेब आंबेडकर ” यांच्या १३५ व्या जयंती सोहळा दिनानिमित्त आयटी आय.निदेशक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष तसेच रासकम.संघटनेचे संघटक सचिव बाळकृष्ण पुतळे आणि जिल्हा सरचिटणीस राजाभाऊ सोनकांबळे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आज सकाळी ११ वाजता आयटीआय निदेशक संघटनेच्या पुणे विभागाचे विभागीय संपर्कप्रमुख तसेच राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या सोलापूर जिल्हा शाखेचे अध्यक्ष युवा नेते विजयकुमार भांगे आणि राज्य कामगार विमा रुग्णालयाचे जेष्ठ नेते आणि रासकम.संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश चव्हाण यांचे हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी रासकम. संघटनेचे जिल्हा कोषाध्यक्ष हुसेनबाशा मुजावर,ज्येष्ठ नेते सटवाजी होटकर, भिमराव लोखंडे, चंद्रकांत चलवादी, प्रविण वाघमारे, लिपिक कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डी.एन. गायकवाड, आरोग्य सेवा (चतुर्थश्रेणी) कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर होनकळस, आशुतोष नाटकर, आर.जे.शिंदे, आयटीआयचे भीमाशंकर कोंडगुळी , रामदास कडतन सर यांच्यासह पदाधिकारी आणि रासकम.संघटनेशी संलग्नीत असलेले खातेनिहाय संघटनेचे पदाधिकारी आणि सदस्य मोठया संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button