सामाजिक

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात ग्रामपंचायतीनी सहभागी व्हावे – गटविकास अधिकारी शंकर कवितके 

अक्कलकोट ( प्रतिनिधी )
राज्याचे मुख्यमंत्री व ग्राम विकास मंत्री यांच्या संकल्पेतून ग्रामीण भागाचा सर्वांगिण विकासाचे उद्दिष्ट ठेवून “ मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियान” राबविण्याचे ठरविले आहे. या अभियानाचा मुख्य उद्देश गावागावात सुशासन प्रस्थापित करणे, ग्रामस्थांमध्ये  आत्मनिर्भरता निर्माण करणे आणि विकासासाठी स्पर्धात्मक वातावरण तयार करणे आहे.योजना केवळ प्रशासकीय यंत्रणेपुरती मर्यादित नसुन, ग्रामस्थांच्या भेट सहभागावर आधारलेली आहे.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात ग्रामपंचायतीनी सहभागी व्हावे असे आवाहन अक्कलकोट पंचायत समिती गटविकास अधिकारी शंकर कवितके यांनी केले. बुधवारी पंचायत समिती अक्कलकोट कार्यालयात गटविकास अधिकारी शंकर कवितके यांनी पत्रकारांना या अभियानाची माहिती दिली.
 ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामविकास विभाग शाश्वत विकास साधाण्यासाठी ठिबक सिंचन, शेततळी,बंधारे, जलसंवर्धन,जलयुक्त‍ शिवार यांसाख्यायोजनांची प्रभावी अंमलबजावणी करत आहे. सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन , रासायनिक खतांचा वापर टाळण्यासाठी प्रयत्न, आवास योजनांतर्गत घरे, महिलांना बचतगटांच्या माध्यमातून सक्षम करणे, तसेच दुग्धोत्पादन मधमाशीपालन, मत्स्यव्यवसाय आणि कुक्कुटपालन यांना चालना  देऊन शेतक-यांचे उत्पन्न वाढविण्यावर भर देण्यात येत आहे. या प्रयत्नांना अभियानातून प्रोत्साहन मिळणार आहे.
अभियानाचे ७ प्रमुख घटक –
सुशासनयुक्त पंचायत –पारदर्शक व लोकाभिमुख्‍  प्रशासन ,सक्षम पंचायत –आर्थिक स्वाबलंबन ,कंपनी सामाजिक उत्तरदायित्व निधी (उर्फ) व लोकवर्गणी
जलसमृध्द, स्वच्छ व हरित गाव-पर्यावरण संरक्षण व पाणी व्यवस्थापन.योजनांचे अभिसरण – मनरेगा व इतर योजनांची प्रभावी अंमलबजावणी
संस्था सक्ष्मीकरण शाळा,अंगणवाडी, आरोग्य केंद्रे यांची बळकटी ,उपजीविका विकास व सामाजिक न्याय- रोजगार निर्मिती व महिला सक्ष्मीकरण
लोकसहभाग व श्रमदान –ग्रामस्थांचा प्रत्यक्ष सहभाग व श्रमदान असा आहे.
पुरस्कार रचना -राज्यात  प्रथम विजेत्या ग्रामपंचायतीस ५ कोटी रुपयांचा राज्यस्तरीय पुरस्कार दिला जाईल. तर व्दितीय ३ कोटी रुपये,तृतीय २ कोटी रुपये पुरस्कार असेल .विभागस्तरीय पुरस्कार प्रत्येक विभागात ३ ग्रामपंचायतीना पुरस्कार प्रथम रुपये १ कोटी,व्दितीय रुपये ८० लाख,तृतीय रुपये ६० लाख , जिल्हास्तरीय पुरस्कार प्रत्येक जिल्हयात ३ ग्रामपंचायतींना पुरस्कार प्रथम रुपये ५० लाख, व्दितीय रुपये ३० लाख, तृतीय रुपये २० लाख. तालुकास्तरीय पुरस्कार:- प्रत्येक तालुक्यात ३ ग्रामपंचायतींना पुरस्कार प्रथम रुपये १५ लाख,व्दितीय रुपये १२ लाख,तृतीय रुपये ८ लाख विषेश पुरस्कार :-प्रत्येक तालुक्यातील २ ग्रामपंचायतींना प्रत्येकी ५ लाख रुपये पुरस्कार आहे.
या अभियानाचा कालावधी १७ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर २०२५ असा असून ,एकुण १०० गुणांच्या निकषांवर मुल्याकंन केले जाईल. पारदर्शक,प्रशासन, आरोग्य,शिक्षण, महिला सक्ष्मीकरण, रोजगार, पर्यावरण, कर वसुली आणि लोकसहभाग यांचा विचार केला जाईल.
“मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियान” ही केवळ स्पर्धा नसून ग्रामीण महाराष्ट्राच्या सामाजिक परिर्वतनाची दिशा आहे. प्रत्येक ग्रामस्थाने यात सहभाग घेतल्यास गावांचा चेहरामोहरा बदलुन शाश्वत विकास साध्य होईल. हे अभियान ख-या अर्थाने लोकचळवळीचे दुरदृष्टीपुर्ण पाऊल ठरेल.
.आमदार.सचिन कल्याणशेट्टी यांनी वरील अभियान अक्कलकोट तालुक्यात यशस्वी करणेकरीता तालुकास्तरीय कार्यशाळेत आवाहन केले होते. बुधवार रोजी तालुक्याचे गट विकास अधिकारी .शंकर कवितके यांनी पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती दिली. याप्रसंगी पंचायत समितीतील कार्यालयीन अधिक्षक दयानंद परिचारक , सहाय्यक गटविकास अधिकारी अमर दोडमनी , विस्तार अधिकारी संजय पाटील , पठाण , कोळी आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button