राजकीय

मुस्लिम उमेदवाराने प्रस्थापित पक्षाची झोप उडवली. : आसिफ जमादार

 

परंडा ( फारुक शेख )भुम परांडा वाशी मतदारसंघातून मुस्लिम चेहरा म्हणून आसिफ जमादार निवडणूक लढवीत आहेत.
बहुजन व अल्पसंख्यांकांना हक्क अधिकार देण्यासाठी प्रयत्न करीत आहे. भूम परांडा वाशीतील सर्व खेडी, वस्ती, शहर, येथे भेट देऊन मतदारांची जनजागृती करीत आहेत .सर्वधर्मसमभावाची भावना मनात घेऊन सर्व दुर्बल शेतकरी, शेतमजूर ,गोरगरीब घटकांना न्याय देण्याचा, सामाजिक सलोखा राखण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहे. मुस्लिम एकता सामाजिक संघटनेच्या माध्यमातुन आसिफ जमादार यांनी बहुजन व मुस्लिम समाजाची सेवा करुन वेळेप्रसंगी मुस्लिम व बहुजनांसाठी धरणे आंदोलने रास्ता रोको करून एक समाजात आदर्श निर्माण केला आहे.तुटपुंज्या रकमेवर काम करणारे होमगार्ड बांधवांच्या मागणीसाठी महाराष्ट्रात लढा उभा करणार आहे.
पोलीस प्रशासनाच्या विविध मागण्यासाठी शासन दरबारी आवाज उठवण्याचं काम करणार आहे. असे, आश्वासन आसिफ जमादार यांनी भूम परंडा वाशी मतदारसंघातील गोरगरीब जनतेसाठी केलेले आहे .व तसेच शेतकरी होमगार्ड चा मुलगा गोरगरीबीची जाण असलेला एक नवीन चेहरा भूम परंडा वाशी मतदारसंघातुन नशीब आजमावत आहे .
यामुळेच एक नवीन चेहऱ्याला तिसरा पर्याय म्हणून नागरीकात चर्चा आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button