सामाजिक
बा भीमा, तुला विनम्र अभिवादन!

बा भीमा, तुला विनम्र अभिवादन!
या देशाने हरवली मूळ माणसं
तरी देशाला हरवून बसलो नाही आम्ही
इतकं करंटं तू होऊ दिलं नाहीस आम्हाला!
हे तूच दिलेलं द्रष्टेपण भीमा
की, आम्ही अजून घेतला नाही
एकही ग्रेनेड बॉम्ब हातात
हे तूच दिलेलं द्रष्टेपण भीमा
की, आम्ही चिरायू ठेवलं
करुणेचं सार्वभौमत्व!
– प्रज्ञा दया पवार
‘लव्ह इन द टाईम ऑफ खैरलांजी’ या दीर्घ कवितेतील अंश ( दृश्यांचा ढोबळ समुद्र, २०१३ पॉप्युलर प्रकाशन )



