महाराष्ट्र

पत्रकार शेख आरिफ यांना आदर्श पत्रकारिता जीवन गौरव पुरस्कार जाहीर

 

नायगाव / नांदेड ( :- सय्यद अजिम नरसीकर )
पत्रकार क्षेत्रात अधिक वर्तमानातून सर्वच विषय अतिशय व्यवस्थितपणे हाताळून सर्वसामान्य जणांना न्याय देण्याची भूमिका बजावत जनतेसमोर एक आदर्श पत्रकारिता ठेवली आहे म्हणून मौजे मांजरम येथे होत असलेल्या सहावे जनसंवाद ग्रामीण साहित्य संमेलनाचे मुख्य संयोजक जीवन मांजरमकर यांनी ज्येष्ठ पत्रकार शेख आरिफ यांना आदर्श पत्रकारिता युवा जीवन गौरव पुरस्कार जाहीर केला आहे.
नायगाव तालुक्यातील मौजे मांजरम येथे शिव जन्मोत्सव निमित्त सहावे जनसंवाद साहित्य संमेलन होणार असून या संमेलनात अनेक साहित्यिक विचारवंत कवी यांची उपस्थिती राहणार आहे तर विविध क्षेत्रातील नामांकित व्यक्तीचे पुरस्कार देखील जाहीर करण्यात आले आहेत याच अणुषंगाने सम्मेलनाचे मुख्य संयोजक जीवन मांजरमकर यांनी ज्येष्ठ पत्रकार शेख आरिफ रसूलसाब यांना आदर्श पत्रकारिता युवा जीवन गौरव पुरस्काराची घोषणा केली सदर पुरस्कार साहित्य संमेलनात मान्यवरांच्या हस्ते वितरित केला जाणार आहे असेही संयोजकांनी कळविले आहे. या जाहीर झालेल्या पुरस्काराबद्दल ज्येष्ठ पत्रकार शेख आरिफ यांचे सर्व चाहता वर्ग,व मित्रपरिवार यांनी अभिनंदन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button