महाराष्ट्र

शेतकऱ्यांच्या साखळी उपोषणास नायगाव मार्केट कमिटीचे.चेअरमन श्रीनिवास पाटील चव्हाण यांचा खंबीर पाठिंबा

 

नायगाव / नांदेड (- सय्यद अजिम नरसीकर )

कारेगाव फाटा येथे सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या बेमुदत साखळी उपोषणास नायगाव मार्केट कमिटीचे चेअरमन श्रीनिवास पाटील चव्हाण यांनी भेट देऊन शेतकऱ्यांना खंबीर आधार दिला.नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार रवींद्र वसंतराव चव्हाण साहेब यांचे काका असलेले चेअरमन श्रीनिवास चव्हाण यांनी उपोषण स्थळी पोहोचून शेतकऱ्यांच्या समस्या प्रत्यक्ष ऐकून घेतल्या. त्यांनी शेतकऱ्यांचे हालअपेष्टा जाणून घेत धीर दिला तसेच योग्य मार्गदर्शन केले.अलीकडील पावसामुळे झालेले प्रचंड पिकांचे नुकसान, त्यातून निर्माण झालेली हातबळ अवस्था आणि त्याच परिणामी शेतकऱ्यांना उपोषणाचा मार्ग पत्करावा लागल्याची.वेदनादायी वस्तुस्थिती त्यांनी हळ हळ व्यक्त केली. “ज्या शेतकऱ्याने आपल्या घामाने जगाला अन्न दिले, त्यालाच स्वतःच्या घरासाठी पोटभर अन्न मिळत नाही,हे अन्यायकारक असून शासनाने तातडीने सकारात्मक पावले उचलली पाहिजेत,असे त्यांनी नमूद केले.ते पुढे म्हणाले की शेतकरी पिकवतो म्हणून समाज जगतो. शेतकरी सुखी झाला तरच जग सुखी होईल. शेतकरी थांबला तर जीवन थांबेल. शेतकऱ्यांच्या प्रश्नांना तोडगा काढण्यासाठी मी स्वतः पुढाकार घेईन आणि त्यांच्या हक्कासाठी झटेन.या भेटीवेळी शेतकऱ्यांनीही आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, संकटाच्या प्रसंगी चेअरमन श्रीनिवास पाटील चव्हाण यांनी जो खंबीर आधार दिला, त्याबद्दल ते सदैव ऋणी राहतील. शेतकऱ्यांचे दुःख समजून घेऊन त्यांच्यासाठी उभे राहणारे नेतृत्व दुर्मिळ आहे, अशी भावना अनेक शेतकऱ्यांनी व्यक्त केली.यावेळी शेतकऱ्यांनी एकमुखाने नायगाव मार्केट कमिटीचे संचालक श्रीनिवास पाटील चव्हाण यांचे अभिनंदन केले तसेच त्यांचा गौरव करत त्यांना मनःपूर्वक धन्यवाद दिले. त्यांच्या पाठिंब्यामुळे उपोषणाला नवे बळ मिळाल्याचे मत शेतकऱ्यांनी नोंदवले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button