Monday, August 31, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

संसदेत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा (मनरेगा ) योजनेचे नाव बदलाविरोधात आंदोलन

Admin by Admin
December 16, 2025
in देश - विदेश
0
संसदेत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा (मनरेगा ) योजनेचे नाव बदलाविरोधात आंदोलन
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 खासदार प्रणिती शिंदे अग्रभागी

नवी दिल्ली –
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा (मनरेगा – MGNREGA) योजनेचे नाव बदलण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात संसद भवन परिसरात काँग्रेस व विरोधी पक्षांच्या खासदारांनी जोरदार आंदोलन केले. या आंदोलनात खासदार प्रियंका गांधी, सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल यांच्यासह सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे या प्रमुखपणे सहभागी झाल्या असून, त्यांनी महात्मा गांधींच्या वारशाचे आणि ग्रामीण मजुरांच्या कायदेशीर हक्कांचे ठाम संरक्षण करण्याची भूमिका मांडली.

सोलापूरमधील मनरेगा लाभार्थ्यांच्या हितासाठी तसेच संविधानिक मूल्यांच्या रक्षणासाठी खासदार प्रणिती शिंदे यांची ठाम भूमिका या आंदोलनातून पुन्हा एकदा स्पष्ट झाली आहे.

संसद भवनातील मकर द्वार येथे झालेल्या आंदोलनात खासदार प्रणिती शिंदे यांनी केंद्र सरकारवर तीव्र टीका करत, मनरेगा ही केवळ योजना नसून ग्रामीण भारतातील गरीबातल्या गरीब मजुरांसाठी रोजगाराचा कायदेशीर हक्क असल्याचे स्पष्ट केले. गेल्या दोन दशकांत या कायद्याने ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट केली असून १०० दिवसांच्या रोजगाराची हमी दिली आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.आंदोलनादरम्यान खासदार प्रणिती शिंदे यांच्यासह काही काँग्रेसच्या खासदारांनी संसद भवनाच्या वरच्या भागात जाऊन प्रतीकात्मक निषेध नोंदवला. या कृतीद्वारे महात्मा गांधींचे नाव योजनेतून वगळण्याबाबतची गंभीर चिंता, राज्य सरकारांवर टाकण्यात येणारा आर्थिक बोजा तसेच ग्रामीण मजुरांच्या हक्कांचे दुर्बलकरण या मुद्द्यांकडे देशाचे लक्ष वेधण्यात आले.नाव बदलामागील खरी भूमिका म्हणजे मागणीवर आधारित रोजगार हमी व्यवस्थेला अर्थसंकल्पीय मर्यादेत अडकवणे. त्यामुळे सर्वसमावेशक व्याप्ती आणि कामाचा हक्क धोक्यात येणार आहे. १२५ दिवसांच्या रोजगाराचे दिलेले आश्वासन प्रत्यक्षात पूर्ण होणार नसून, त्याचा आर्थिक भार राज्य सरकारांवर ढकलण्यात येणार आहे.

राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या विचारांतून प्रेरित असलेल्या या योजनेतून राष्ट्रपित्याचे नाव हटवणे अयोग्य असून, मनरेगाचे नामांतर व सुचवलेले बदल थेट संविधानावर आघात करणारे आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून काँग्रेस नेत्यांनी केंद्र सरकारकडे मागणी केली की, कोणतीही सविस्तर चर्चा व संसदेचा सल्ला न घेता हे विधेयक मंजूर करू नये. हे विधेयक तात्काळ मागे घ्यावे आणि सखोल तपासणी व व्यापक चर्चेसाठी संसदच्या स्थायी समितीकडे पाठवावे.

Previous Post

कोल्हापूर हादरले! ; प्रसिद्ध डॉक्टरने मृत्यूला कवटाळले, शेवटचा मेसेज वाचून पोलिसही चक्रावले

Next Post

अक्कलकोट नगरपरिषद निवडणुकीत जातीय समीकरणे भावी नगर सेवकानां तारणार की मारक ठरणार !

Admin

Admin

Next Post
अक्कलकोट नगरपरिषद निवडणुकीत जातीय समीकरणे भावी नगर सेवकानां तारणार की मारक ठरणार !

अक्कलकोट नगरपरिषद निवडणुकीत जातीय समीकरणे भावी नगर सेवकानां तारणार की मारक ठरणार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (43)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (424)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (787)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

156965
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697