भैरवनाथ शुगर सोनारी गाळप हंगाम 2025-26 ची पहिली उचल प्रती मे.टन 2800 रुपये प्रमाणे देणार : चेअरमन अनिल सावंत

परंडा / धाराशिव ( फारूक शेख )
परंडा तालुक्यातील सोनारी येथील भैरवनाथ शुगर या साखर कारखान्याचे गांळप हंगाम 2025-26 मधील गाळप आजअखेर 151445 मे.टन झाले आहे. शेतकन्यांचा ऊस गाळपाअभावी शिल्लक राहणार नाही असे कारखान्याचे चेअरमन अनिल सावंत यांनी सांगितले. ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे हिताचा विचार करुन कारखान्याचे संस्थापक तथा परंडा मतदारसंघाचे आमदार . डॉ. तानाजीराव सावंत यांनी भैरवनाथ शुगर सोनारी युनिट साठी गाळप हंगाम 2025-26 ची पहिली उचल प्रती मे. टन 2800 रुपये प्रमाणे देणार असल्याचे कारखान्याचे चेअरमन अनिल सावंत यांनी जाहीर केले आहे.
भैरवनाथ शुगर सोनारी युनिटचे गाळप परंडा मतदारसंघाचे आमदार .डॉ. तानाजीराव सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली व कारखान्याचे चेअरमन . अनिल सावंत व व्हाईस चेअरमन विक्रम सावंत यांच्या नियोजनाने जोमात चालू आहे. भैरवनाथ शुगरने नेहमीच शेतकऱ्यांचे हिताचा विचार करुन एफ.आर.पी. पेक्षा जास्त दर ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलेला आहे. शेतकऱ्यांनी चांगल्या प्रतीचा परिपक्व ऊस कारखान्यास गाळपास पाठवून सहकार्य करावे असे आवाहन कारखान्याचे चेअरमन अनिल सावंत यांनी केले.



