सोलापूर
गणेशोत्सवातील सामाजिक उपक्रमासाठी पत्रकार सिध्दार्थ भडकुंबे यांचा सन्मान

-सोलापूर ( प्रतिनिधी )श्री गणेशोत्सव २०२५ निमित्त पोलीस आयुक्तालय, सोलापूर शहरामार्फत राबविण्यात आलेल्या सामाजिक उपक्रमात युवा पत्रकार सिध्दार्थ भडकुंबे यांनी दिलेल्या सक्रिय योगदानाबद्दल त्यांना प्रशंसापत्र देऊन गौरविण्यात आले.गणेशोत्सव काळात तसेच विसर्जन मिरवणुकीच्या वेळी शहरातील विविध गणेशोत्सव मंडळांना भेटी देऊन त्यांच्या सामाजिक उपक्रमांचे, देखाव्यांचे, पारंपरिक वाद्य मिरवणुकीचे, मंडळाच्या शिस्तीचे तसेच राष्ट्रीय एकात्मतेच्या जपणुकीचे परीक्षण करून उत्कृष्ट मंडळांची निवड करण्याची जबाबदारी भडकुंबे यांनी यशस्वीपणे पार पाडली.या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत पोलीस आयुक्तालय सोलापूर शहराच्या वतीने पोलीस आयुक्त एम. राज कुमार (भा.पो.से.) यांच्या हस्ते त्यांना प्रशंसापत्र देण्यात आले.



