शैक्षणिक
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात धानय्य कौटगीमठ यांचा गौरवपूर्ण सत्कार

अक्कलकोट ( प्रतिनिधी ) : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा २१ वा दीक्षांत समारंभ आज महामहीम राज्यपाल श्री आचार्य देवव्रत यांच्या अध्यक्षतेच्या नावाखाली संपन्न झाला. या समारंभात अक्कलकोट तालुक्यातील तोलनूर गावचे सुपुत्र धानय्य गुरलिंगय्या कौटगीमठ यांना पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली.
समारंभास महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, डॉ. गोपाल कुमुदा श्रीनिवास मुगेराया (उपाध्यक्ष, गोवा उच्च शिक्षण परिषद व नीटे अभिमत विद्यापीठ), तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश तानुबाई अण्णा महानवर उपस्थित होते. या मान्यवरांच्या शुभहस्ते धानय्य कौटगीमठ यांना डॉक्टरेट पदवी बहाल करण्यात आली.
कौतगीमठ यांनी “The Literary World of Sudha Murthy: An Exploration” या विषयावर इंग्रजी भाषेत प्रबंध सादर केला असून त्यांना दयानंद कॉलेज, सोलापूर येथील इंग्रजी विभागाचे प्राध्यापक डॉ. टी. एन. कोळेकर यांचे मार्गदर्शन लाभले.
सध्या धानय्य कौटगीमठ के. एल. ई. मंगरुळे हायस्कूल, अक्कलकोट येथे शिक्षक म्हणून कार्यरत असून त्यांनी अद्यापपर्यंत ७९ वेळा NET/SET/TET पात्रता परीक्षा उत्तीर्ण होऊन जागतिक विक्रम प्रस्थापित केला आहे. विशेष म्हणजे त्यांनी यूट्यूबद्वारे स्पर्धा परीक्षेतील विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन केले असून आजपर्यंत १०५२ विद्यार्थी त्यांच्या मार्गदर्शनाखाली पात्र झाले आहेत.
त्यांच्या शैक्षणिक व संशोधन प्रवासात डॉ. शिवाजी शिंदे (सहाय्यक कुलसचिव, सोलापूर विद्यापीठ), डॉ. अमोघसिद्ध चंडके (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) तसेच श्री अण्णाराव होरकेरी यांचे विशेष सहकार्य लाभले.
या समारंभास गुरूशांत तलवार, विश्वनाथ राठोड,गुरुलिंगय्या कौटगीमठ गंगाबाई कौटगीमठ, संगीता डी. के., भौरम्मा के. एम., शांतलक्ष्मी कौटगीमठ आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच के. एल. ई. मंगरुळे हायस्कूलचे मुख्याध्यापक नंदाजी एस. कदम, उपमुख्याध्यापक जी. बी. पाट्टेद, पर्यवेक्षिका सौ. आरती तोलनूरे, सर्व शिक्षकवृंद, पालक व विद्यार्थी यांनी कौटगीमठ यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.