सामाजिक

अक्कलकोट येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती विविध उपक्रमाने साजरी

विदयार्थ्याना वहया तर महिलानां साडी वाटप, 
सेवा गौरव पुरस्काराने मान्यवरांचा सत्कार
अक्कलकोट ( प्रतिनिधी )
साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०५ व्या जयंतीनिमित्त, दिव्याग्नी जयंती उत्सव समिती, साठे नगर माणीक पेठ अक्कलकोट  येथे संस्थापक अध्यक्ष   उद्योगपती किसन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा संपर्कप्रमुख वसंत देडे जिल्हा अध्यक्ष नागेश जाधव नेतृत्वाखाली महिलाना साडी वाटप, शालेय विद्यार्थ्याना वही वाटप, मुकबधीर विद्यार्थ्यांना टावेल वाटप व मान्यवरांचा सेवा गौरव पुरस्कार वितरण आदि उपक्रमांनी साजरा करण्यात आला .
क्रांतिवीर लहुजी शक्ती सेनेचे संस्थापक  शंकर भाऊ तडाखे , माजी उपनगराध्यक्ष यशवंत धोंगडे, माजी नगरसेवक मिलन कल्याणशेट्टी, शिवशरण जोजन यांच्या उपस्थिती मध्ये, उत्कृष्ट सेवा पुरस्कार वितरण करण्यात आले .
या प्रसंगी सेवा गौरव पुरस्काराने    तहसीलदार  अक्कलकोट विनायक मगर , पोलीस निरिक्षक राजेंद्र टाकणे , सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश बागाव, पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग पवार , पोलीस उपनिरीक्षक मुकेश गायकवाड या मान्यवरांचा   उत्कृष्ट सेवा गौरव पुरस्काराने स्मृती चिन्ह , फेटा पुष्पहार, पुष्पगुच्छ देऊन संस्थापक अध्यक्ष किसन जाधव , जिल्हा अध्यक्ष नागेश जाधव , जिल्हा संपर्क प्रमुख वसंत देडे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. .  मान्यवरांचे स्वागत व सत्कार किसन जाधव यांच्या हस्ते करण्यात आले .
अक्कलकोट उत्तर पोलीस स्टेशनचे नूतन पोलीस निरीक्षक   दीपक भिताडे  यांचे देखील मातंग समाजाच्या वतीने  सन्मान करण्यात आला. जिल्हा अध्यक्ष  नागेश जाधव यांच्या संकल्पनेतून  समाजातील सुमारे १०५ गरीब महिलांना  साड्या वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला.  होतकरू गरीब विद्यार्थ्यांना १०५ वह्या वाटप करण्यात आले. या कार्यक्रमात  समाजाचे जेष्ठ समाजसेवक  राजू लोखंडे यांच्या शुभहस्ते मूकबधिर विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले. लहुजी शक्ती सेनेचे नूतन तालुका अध्यक्ष  बाबाजी कांबळे, अमर लोखंडे यांचा सत्कार  जिल्हाध्यक्ष नागेश जाधव यांच्या हस्ते करण्यात आला, या प्रसंगी दहिटणे गावचे सरपंच मोरे नितीन मोरे ,लहुजी शक्ती सेनेचे नूतन तालुका अध्यक्ष    बाबाजी कांबळे, तालुका संघटक  अनिल झंपले, तालुका उपाध्यक्ष पृथ्वीराज नाईक नवरे, शहराध्यक्ष अमर लोखंडे, समाजाचे जेष्ठ राजू लोखंडे, संतोष पारखे उत्सव समिती अध्यक्ष  ज्ञानेश्वर कांबळे हसापुर शाखा अध्यक्ष लखन पाटोळे, आदि कार्यकर्ते उपस्थित होते  जयंती उत्सवाची सांगता भव्य मिरवणुकीने झाली . मान्यवर उपस्थितांचे 
 समस्त मातंग समाजाचे आभार समाजसेवक वसंत देडे यांनी मानले . सुत्रसंचालन शिवानी भोसले , मराठा सेवा संघाचे जिल्हा कार्यकारणी सदस्य अतुल जाधव यांनी केले .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button