केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री .रामदास आठवले यांची बनसोडे यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट

परंडा / धाराशिव ( फारुक शेख )आरपीआय आठवले गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी परंडा येथे रिपब्लिकन पक्षाचे राज्य सचिव संजयकुमार बनसोडे यांच्या निवासस्थानी सांत्वन भेट दिली.
संजयकुमार बनसोडे यांच्या आईंचे काही दिवसांपूर्वी दुःखद निधन झाले होते. विजयकुमार बनसोडे संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती, परंडा यांच्या पत्नीचे, तसेच रिपब्लिकन सोशल मीडियाचे जिल्हा अध्यक्ष आकाशभाऊ बनसोडे यांच्या मातोश्री सौ. अनिता बनसोडे यांचे तिन महिन्यांपूर्वी अकस्मात निधन झाले होते.
या दुःखद प्रसंगी मा. आठवले यांनी बनसोडे परिवाराची सांत्वनपर भेट घेऊन त्यांच्या दुःखात सहभागी होत धीर देण्याचा प्रयत्न केला.
यावेळी रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष . राजाभाऊ सरवदे, महाराष्ट्र जॉइंट सेक्रेटरी राजाभाऊ ओव्हाळ, जिल्हा अध्यक्ष विद्यानंद बनसोडे,जिल्हा नेते रवि माळाळे, भाजप तालुका अध्यक्ष अरविंद (बप्पा) रगडे नवनाथ कसबे राहुल बनसोडे तसेच परंडा तालुक्यातील सर्व पक्षीय जाती धर्माचे लोक व कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



