Wednesday, September 2, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

आस्थाच्या वतीने नागपंचमीचा अनोखा सामाजिक उपक्रम , अनाथ व वृद्ध महिलांसाठी सौंदर्य साहित्याचे वाटप

Admin by Admin
July 30, 2025
in सोलापूर
0
आस्थाच्या वतीने नागपंचमीचा अनोखा सामाजिक उपक्रम ,   अनाथ व वृद्ध महिलांसाठी सौंदर्य साहित्याचे वाटप
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
सोलापूर ( प्रतिनिधी )
हिंदू संस्कृतीतील श्रावण महिना हा भक्तिभाव, व्रते-वैकल्ये व सण-उत्सवांनी नटलेला असतो. यामध्ये नागपंचमी हा महिलांचा विशेष लाडका सण. या सणात मेंदी, नेलपेंट आणि पारंपरिक शृंगार यांना विशेष महत्त्व असते. परंतु समाजात अजूनही एक असा वर्ग आहे, जो या आनंदापासून वंचित आहे त्या अनाथ, मानसिकदृष्ट्या अस्वस्थ किंवा दुर्लक्षित महिला.
या पार्श्वभूमीवर आस्था फाऊंडेशनच्या वतीने यंदा नागपंचमी एक सामाजिक बांधिलकीचा सण ठरला. एम्प्लॉयमेंट चौकातील ‘मंगलदृष्टी’ या संस्थेत राहणाऱ्या वृद्ध, मानसिकदृष्ट्या अस्वस्थ महिलांना नेलपेंट, मेंदी, टिकल्या, कंगवे, केसांचे क्लिप्स, सुगंधी साबण, हात रुमाल, मोत्याचे माळ, कानातले रिंगा व पॉंड्स पावडर यांचा सुंदर गिफ्ट बॉक्स देण्यात आला.
उमा (बिहार), सरस्वती आजी (आंध्रप्रदेश) आणि वंदना (सोलापूर) या महिलांनी या सौंदर्य साहित्याचा आनंद लुटताना डोळ्यांतून आनंदाश्रू ढाळले. उपस्थित महिलांबरोबर फेर धरून गाणी गायली, गोडधोड खाऊ वाटला गेला. काही महिलांना स्वयंसेविकांनी प्रेमाने मेंदी लावली, नखांवर नेलपेंट लावले आणि त्यांच्या चेहऱ्यावर उमललेले हास्य उपस्थित प्रत्येकाच्या मनात घर करून गेले.
सोलापूर मधील  संस्कार आश्रम, वासल्य निराधार आश्रम, आधार निराधार आश्रम, मंगलदृष्टी निराधार आश्रम, कुष्ठरोग वसाहत, बेघर निवारा केंद्र, तसेच झोपडपट्ट्यांमधील निराधार महिलांसह हा उत्सव साजरा करण्यात करण्यात आला. तसेच अनाथ आश्रमातील बालिकांसाठीही सौंदर्य साहित्याचे वाटप करण्यात आले. मुलींनी नृत्य-सादरीकरण करत, गाणी म्हणत सणाचा आनंद द्विगुणित केला.
या प्रसंगी नीलिमा हिरेमठ, कांचन हिरेमठ, छाया गंगणे, संपदा जोशी, सविता जोशी, अनिता तालीकोटी, सुरेखा पाटील, विजयालक्ष्मी सिरसी, सविता उपाध्ये, शारदा जोशी, शैला दिडवणीय, स्वामी चराटे मॅडम  आणि गवळी ताई, राधा वहिनी, प्रकाश डांगरे, पुष्कर पुकाळे, अविनाश मार्चल ,विजय छंचुरे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे समन्वयक विजयकुमार छंचुरे म्हणाले,
 “ही केवळ भेटवस्तू नव्हे, तर आत्मभान, सौंदर्याची भावना आणि एक सामाजिक आपुलकी यांचा संगम आहे.”आस्था फाउंडेशनद्वारे नेहमी नव-नवीन उपक्रम राबवले जाते.

Previous Post

आमच्या भाषणामुळे त्या सव्वीस मृतांच्या कुटुंबीयांना वाईट वाटले असेल, तर हजार वेळा माफी मागू, पण भाजपचे ट्रोल्स, ट्रोलिंग आर्मी आणि अंधभक्तांची मी कधीच माफी मागणार नाही.: खासदार प्रणिती शिंदे

Next Post

पंतप्रधान आवास योजना कागदावरच, लाभार्थ्यांना गायरान जमिनीवर जागा उपलब्ध करून द्या; खासदार प्रणिती शिंदे यांची मागणी

Admin

Admin

Next Post
बिहार विधानसभा निवडणुकीसाठी स्क्रिनिंग कमिटीमध्ये खासदार प्रणिती शिंदे यांची निवड

पंतप्रधान आवास योजना कागदावरच, लाभार्थ्यांना गायरान जमिनीवर जागा उपलब्ध करून द्या; खासदार प्रणिती शिंदे यांची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (789)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (225)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157237
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697