Wednesday, September 2, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

मंत्रिमंडळ फेरबदलाचे संकेत; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून दिल्लीत भेटीगाठीचे सत्र सुरू

Admin by Admin
July 26, 2025
in राजकीय
0
मंत्रिमंडळ फेरबदलाचे संकेत; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून दिल्लीत भेटीगाठीचे सत्र सुरू

Oplus_0

0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

मुंबई : राज्यातील महत्त्वाचे प्रकल्प मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विविध केंद्रीय मंत्र्यांच्या गाठीभेटी घेतल्या. मात्र, फडणवीस यांच्या या दिल्ली दौऱ्यामुळे मंत्रिमंडळ फेरबदलाचे वारे वाहू लागले आहेत. राज्यातील ८ मंत्र्यांना डच्चू देण्यात येणार असून नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाण्याची जोरदार चर्चा राज्याच्या राजकारणात सुरू आहे.

मुख्यमंत्री दिल्लीत असताना राज्याच्या राजकीय वर्तुळात मंत्रिमंडळ बदलाची जोरदार चर्चा सुरू आहे. जवळपास ८ मंत्र्यांना बदलण्यात येणार असून त्याऐवजी नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात येणार असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे विधानसभेचे सभापती राहुल नार्वेकर यांना पर्याय शोधण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे कळते. नार्वेकर यांना मंत्रिमंडळात स्थान दिल्यास भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांना विधानसभेचे सभापती केले जाऊ शकते, अशी चर्चा आहे.

ज्या मंत्र्यांची मंत्रिपदे धोक्यात येण्याची शक्यता आहे, त्यात शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट, संजय राठोड, भरत गोगावले आणि योगेश कदम यांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे माणिकराव कोकाटे यांचेही मंत्रिपद जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मुख्यमंत्री कार्यालयाने दिलेल्या निवेदनानुसार, राज्यातील पाच मोठ्या प्रकल्पांना जागतिक वित्तसंस्थांकडून निधी हवा आहे. त्यासाठी फडणवीस यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेतली. या प्रकल्पासाठी राज्याला ३.५ अब्ज डॉलर्सची गरज आहे.

महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेच्या सुदृढ व्यवस्थापनाचे अर्थमंत्र्यांनी कौतुक केले आणि आर्थिक व्यवहार विभागाला खालील प्रकल्पांसाठी बहुवर्षीय प्रकल्प म्हणून मंजूर करण्याचे निर्देश दिले.

Previous Post

रिपब्लिकन पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी बिनविरोध निवड 

Next Post

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती मिरवणूकीस रात्री १२ वाजेपर्यंत परवानगी मिळावी – वंचितची मागणी

Admin

Admin

Next Post
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती मिरवणूकीस रात्री १२ वाजेपर्यंत परवानगी मिळावी – वंचितची मागणी

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती मिरवणूकीस रात्री १२ वाजेपर्यंत परवानगी मिळावी - वंचितची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (790)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (226)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157266
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697