Thursday, September 3, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

अक्कलकोट बंदला तालुक्यातील आंबेडकरवाद्यांचा पाठिंबा 

Admin by Admin
July 17, 2025
in सामाजिक
0
अक्कलकोट बंदला तालुक्यातील आंबेडकरवाद्यांचा पाठिंबा 

Oplus_16777216

0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
अक्कलकोट (प्रतिनिधी ) संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष  पुरोगामी विचारवंत , संविधान, लोकशाहीवादी नेते प्रवीण दादा गायकवाड यांच्यावर अक्कलकोट येथे कार्यक्रमासाठी आले असता त्यांच्यावर भ्याड हल्ला करण्यात आला. या हल्ल्याच्या निषेधार्थ सकल मराठा समाज व बहुजन समाजाच्या वतीने दिनांक १८ जुलै रोजी अक्कलकोट बंदची हाक देण्यात आली असून या बंदला अक्कलकोट शहर व तालुक्यातील आंबेडकरवादी चळवळीतील पदाधिकारी, कार्यकर्ते  यांचा जाहीर पाठिंबा असणार आहे अशी माहिती माजी सरपंच तथा आंबेडकरी चळवळीतील नेते रमेश बनसोडे यांनी पत्रकारांशी बोलताना दिले.
 माजी सरपंच रमेश बनसोडे यांनी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष थोर विचारवंत प्रवीण गायकवाड यांच्यावर दिनांक १३ जुलै रोजी श्री फतेसिंह शिक्षण संस्था अक्कलकोट व सकल मराठा समाज अक्कलकोट यांनी आयोजित केलेल्या श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे भोसले यांच्या नागरी सत्कारासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्यासाठी आले असता प्रियदर्शनी सांस्कृतिक भवन च्या आवारात त्यांच्यावर शाही फेकून मारहाण करत भ्याड हल्ला करण्यात आला .या निंदनीय घटनेचा आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी निषेध नोंदविला आहे. प्रवीण गायकवाड हे पुरोगामी , लोकशाही , संविधानवादी विचारवंत , नेते आहेत. त्यांचे काम हे राज्यातच नव्हे तर देशपातळीवर दखल घेतले गेले आहे. मराठा समाजासह बहुजन समाजाला शिव शाहू फुले आंबेडकरी चळवळीत आणण्याचे काम प्रवीण गायकवाड यांनी केले आहे. त्यांच्यावर अक्कलकोट येथे भ्याड जीवघेणा हल्ला होता करण्यात आला होता. हे अशोभनीय आहे. या प्रकरणातील हल्लेखोरांवर मकोका कायद्यान्वये गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात यावी. सराईत गुन्हेगार असलेल्या हल्लेखोरांना मदत करणाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर ही कारवाई करण्यात यावी अशी मागणी माजी सरपंच रमेश बनसोडे यांनी केली आहे. इतक्या मोठ्या व्यक्तीला कार्यक्रमास बोलावून आणत असताना त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी ही कार्यक्रमांच्या आयोजकाची असते. गाफिल राहिल्यामुळेच प्रवीण गायकवाड यांच्यावर भ्याड हल्ला करण्याची सराईत गुन्हेगारांची मजल गेली असे मत माजी सरपंच रमेश बनसोडे यांनी व्यक्त केले. प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ सकल मराठा समाज व बहुजन समाज यांच्या वतीने दिनांक १८ जुलै रोजी पुकारण्यात आलेल्या अक्कलकोट बंदला अक्कलकोट तालुक्यातील आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांचां जाहीर पाठिंबा असणार आहे असे माजी सरपंच रमेश बनसोडे यांनी सांगितले.
Previous Post

सकल मराठा समाजाकडून शुक्रवारी अक्कलकोट बंदची हाक

Next Post

माथाडी कामगार बांधवांकडून आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचा नागरी सत्कार

Admin

Admin

Next Post
माथाडी कामगार बांधवांकडून आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचा नागरी सत्कार

माथाडी कामगार बांधवांकडून आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचा नागरी सत्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आमच्याबद्दल

Rayat Sandesh

रयत संदेश या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क - मुख्य संपादक - स्वामीराव गायकवाड बातम्या व सर्व प्रकारच्या जाहिरातीसाठी संपर्क मो - -9850943557 , 7385366330 rayatsandeshnews@gmail.com

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157422
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697