राजकीय

लोकसभेतील विरोधी पक्षनेते, खासदार राहुल गांधी यांनी नाशिक येथे राज्यातील वरिष्ठ काँग्रेस नेत्यांशी संवाद

नाशिक – लोकसभेतील विरोधी पक्षनेते, खासदार राहुल गांधी यांनी नाशिक येथे राज्यातील वरिष्ठ काँग्रेस नेत्यांशी संवाद साधत महाराष्ट्रातील सद्य राजकीय परिस्थिती आणि संघटनात्मक तयारीचा सविस्तर आढावा घेतला.

काँग्रेसचे संघटन अधिक मजबूत करण्यासाठी, तळागाळातील कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी आणि आगामी राजकीय आव्हानांना सामोरे जाण्यासाठी आवश्यक असलेल्या विविध विषयांवर यावेळी सखोल चर्चा करण्यात आली.

यावेळी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष  हर्षवर्धन सपकाळ, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते . विजय वडेट्टीवार, विधान परिषदेतील काँग्रेस पक्षाचे गट नेते . सतेज ऊर्फ बंटी पाटील, माजी मुख्यमंत्री  पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य  बाळासाहेब थोरात, नसीम खान, . चंद्रकांत हंडोरे,  माणिकराव ठाकरे, सौ. रजनी पाटील, मुंबई काँग्रेस अध्यक्षा खा. वर्षा गायकवाड, खा. शोभा बच्छाव, खा. प्रणिती शिंदे, डॉ. विश्वजीत कदम, आ. हेमंत ओगले, प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष . मोहन जोशी, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव . बी.एम. संदीप, रेहाना चिश्ती, वामशी रेड्डी उपस्थित होते.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button