शैक्षणिक

रा गे शिंदे महाविद्यालयातील श्रीमती पद्मा शिंदे यांची कार्यालयीन अधीक्षक तर महेश पडवळ यांची मुख्य लिपिक म्हणून पदोन्नती

परंडा ( प्रतिनिधी )परंडा येथील श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिव संचलित शिक्षण महर्षी गुरुवारी रा गे शिंदे महाविद्यालय परांडा येथे कार्यालयीन अधीक्षक म्हणून श्रीमती पद्मा शिंदे यांची तर मुख्य लिपिक म्हणून महेश पडवळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संस्थेचे सचिव संजय निंबाळकर यांनी या दोघांनाही ज्येष्ठतेनुसार पदोन्नती दिली आहे.सदर दोन्ही कर्मचाऱ्यांना नियुक्ती पत्र देऊन पदोन्नती दिली आहे. दोघांच्या या नियुक्ती बद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सुनील जाधव यांनी बुके देऊन त्यांचा सत्कार केला.या प्रसंगी उपप्राचार्य डॉ महेशकुमार माने प्रशासकीय अधिकारी भाऊसाहेब दिवाने स्टाफ सेक्रेटरी डॉ शहाजी चंदनशिवे कनिष्ठ विभागाचे पर्यवेक्षक प्रा किरण देशमुख यांची उपस्थिती होती. प्राचार्य डॉ सुनील जाधव यांनी दोन्ही पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.दोन्हीही कर्मचाऱ्याच्या पदोन्नती मुळे महाविद्यालयातील प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button