महाराष्ट्र
अखिल भारतीय आदिवासी काँग्रेस – महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी प्रा. वसंतराव पुरके यांची निवड

मुंबई -महाराष्ट्र राज्याचे माजी शिक्षण मंत्री,संवेदनशील विचारवंत आणि आदिवासी समाजाच्या हक्कासाठी सातत्याने लढणारे.प्रा.वसंतराव चिंदूजी पुरके यांची “अखिल भारतीय आदिवासी काँग्रेस – महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष” पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
या नियुक्तीमुळे आदिवासी समाजाच्या प्रश्नांना नवी दिशा मिळेल आणि काँग्रेस पक्षाच्या आदिवासी धोरणांना बळकटी मिळेल,असा ठाम विश्वास केला जात आहे.



