सोलापूर येथील सुर्यकांत गोगर कन्नड शाळा येथे शिवसेना कामगार आघाडीतर्फे शालेय साहित्य वाटप

अक्कलकोट ( प्रतिनिधी )महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री , शिवसेना पक्ष प्रमुख एकनाथ शिंदे , शिवसेना सचिव संजय मोरे यांच्या आदेशाने शिवसेना बांधकाम कामगार सेना महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्रीतम धारिया सोलापूर जिल्हा शिवसेना बांधकाम कामगार सेना व बीडी कामगार सेना व शिवसेना बांधकाम कामगार सेना सोलापूर जिल्हा महिला आघाडी यांच्या संयुक्त विद्यमानाने.सोलापूर येथील सुर्यकांत गोगर कन्नड शाळा वार्ड क्रमांक १८ सत्तर फुट रोड येथील शाळेमध्ये शालेय साहित्य वाटप करण्यात आले. सदरचा उपक्रम २६ जून रोजी सकाळी ११ वाजता करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सोलापूर जिल्हा लोकसभा संपर्कप्रमुख महेश नाना साठे.व बसवारुढ मठाचे प्रमुख शिवपुत्र सरवडकर अप्पाजी , महिला आघाडी सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख अनिता माळगे , शिवसेना सोलापूर जिल्हा प्रमुख अमर पाटील , शिवसेना सोलापूर शहरप्रमुख सचिन चव्हाण , शिवसेना बांधकाम कामगार सेना जिल्हा अध्यक्ष साहेबांना तेगेळी शिवसेना बांधकाम कामगार सेना सोलापूर जिल्हा महिला आघाडी जिल्हा अध्यक्ष वैशाली हावनूर , सोलापूर जिल्हा बांधकाम कामगार सेना सोलापूर जिल्हा उपप्रमुख स्वामीनाथ हेगडे , माहिती अधिकार सोलापूर जिल्हा अध्यक्ष योगेश सुळे युवती सेना सोलापूर जिल्हा प्रमुख प्रियांका पारांडे आदीचीं प्रमुख उपस्थिती होती. उपस्थित मान्यवराच्यां हस्ते शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.