Tuesday, September 1, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

करमाळा येथील ” हमाल भवन ” येथे कायदेविषयक शिबिर संपन्न…

Admin by Admin
June 6, 2025
in सोलापूर
0
करमाळा येथील ” हमाल भवन ” येथे कायदेविषयक शिबिर संपन्न…
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

करमाळा ( प्रतिनिधी ) : – करमाळा येथील कृषी उत्पन्न बाजार समिती मधील ” हमाल भवन ” येथे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा न्यायाधीश मनोज एस. शर्मा व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव यु.पी. देवर्षी व तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष न्या. संजय घुगे यांचे कायदेविषयक शिबीर या मार्गदर्शनानुसार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमास तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर न्यायाधीश संजय मो. घुगे तसेच करमाळा बार असोसिएशनचे उपाध्यक्ष ॲड.एस.ए.रोकडे, हमाल पंचायत चे अध्यक्ष व आदिनाथ सह. साखर कारखान्याचे संचालक ॲड. राहुल सावंत, ॲड. बलवंत राऊत, ॲड. नवनाथ राखुंडे, ॲड. प्रशांत बागल आदी मान्यवर उपस्थित होते.
न्यायाधीश संजय मो. घुगे यांनी अध्यक्षीय भाषणात आंतरराष्ट्रीय कामगार दिन, असंघटीत कामगारांसाठीच्या योजना, बांधकाम व शेती कामगारांचे प्रश्न व त्यांना उपलब्ध असणा-या योजना तसेच तंबाखु विरोधी दिन व बाल स्नेही कायदेशीर सेवा हे विषय सारांशमध्ये समजावून सांगून विषेशत्वाने ई श्रम कार्डाचे महत्व विषद केले.
या कार्यक्रमास आंतरराष्ट्रीय कामगार दिन या विषयावर ॲड. राहुल सावंत यांनी मनोगत व्यक्त केले.
सदर कार्यक्रमास ॲड.एस.ए.रोकडे यांनी असंघटीत कामगारांसाठी राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाची सन २०१५ ची योजना या विषयावर तर ॲड. नवनाथ राखुंडे यांनी तंबाखु विरोधी दिन व राष्ट्रीय विधी सेवाप्राधिकरणाची सन २०२४ ची बालस्नेही कायदेशीर सेवा या विषयावर तसेच ॲड. बलवंत राऊत यांनी बांधकाम व शेती कामगारांचे प्रश्न तसेच केंद्र व राज्य सरकार यांच्या कामगारांसाठी असणा-या विविध योजना या विषयावर वरील मान्यवरांनी आपले मोलाचे मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन आर.पी. खराडे कनिष्ठ लिपीक, सुरज सुरवसे, कनिष्ठ लिपीक यांनी केले. सदर कार्यक्रमास करमाळा तालुका हमाल पंचायत येथील अनेक मान्यवर तसेच एकुण १५० हमाल, तोलार व माथाडी कामगार तसेच सागर सामसे व आदी मान्यवर उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲड. राहुल सावंत यांनी तर आभार प्रदर्शन ॲड. प्रशांत बागल यांनी मानले.

Previous Post

एकनाथ शिंदे दिलेला शब्द पाळतो – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Next Post

मराठा सेवा संघ करमाळा यांच्या वतीने अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांना विविध मागण्यांचे पत्र

Admin

Admin

Next Post
मराठा सेवा संघ करमाळा यांच्या वतीने अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र  पाटील यांना विविध मागण्यांचे पत्र

मराठा सेवा संघ करमाळा यांच्या वतीने अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांना विविध मागण्यांचे पत्र

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (788)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157100
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697