सोलापूर

मराठा सेवा संघ करमाळा यांच्या वतीने अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांना विविध मागण्यांचे पत्र

करमाळा ( आयुब शेख )मराठा सेवा संघ करमाळा यांच्या वतीने अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांना विविध मागण्यांचे पत्र मराठा सेवा संघाचे अध्यक्ष सचिन काळे व सहकार्याने दिले. यामध्ये मराठा समाजातील बांधवांना अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाचा लाभ जास्तीचा मिळत नाही बँका कर्ज देत नाहीत. 2020 च्या प्रस्तावानुसार शैक्षणिक कर्ज मिळत नाही तसेच व्याज परतावा हे चार ते पाच महिन्यापर्यंत लांबणीवर पडत आहे .तसेच यलो आय दोन दोन तीन तीन महिने मिळत नाही .तो दोन ते तीन दिवसातच मिळावा तसेच बँकांनी कर्ज न दिल्यामुळे तक्रार कोठे करावे याचाही ताळमेळ नाही यासाठी प्रत्येक तालुक्यामध्ये मदत कक्ष कार्यालय चालू करावे व अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळास शंभर कोटी व त्यापेक्षा जास्तीचा निधी मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांस कडून पाठपुरावा करून आपण मिळवून द्यावा तसेच अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाचे कर्ज सोपे आणि सुलभ कमी कागदपत्रांमध्ये कसे मिळेल अशा प्रकारच्या नियम व अटी कराव्यात किचकट त्रुटी काढून टाकाव्यात अशा अनेक विविध मागण्यांचे पत्र मराठा सेवा संघाचे अध्यक्ष सचिन काळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवश्री नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांना देण्यात आले व त्यांनीही सकारात्मक प्रतिसाद देत सचिन काळे यांना या बाबींची पूर्तता करण्याचे तोंडी आश्वासन दिले आहे व मराठा सेवा संघाच्या वतीने नरेंद्र पाटील यांचे अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा ही दिल्या व काही काम असतील तर हक्काने सांगत जावा असेही पाटील यांनी सांगितले. यावेळी सोलापूर म न पा चे नगरसेवक आनंद जाधव व सामाजिक कार्यकर्ते संदीप काळे व इतर बांधव उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button