Wednesday, September 2, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

एकनाथ शिंदे दिलेला शब्द पाळतो – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Admin by Admin
June 6, 2025
in राजकीय
0
एकनाथ शिंदे दिलेला शब्द पाळतो – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

 अक्कलकोट ( प्रतिनिधी )शिवसेना पक्षात दररोज प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. मी जी कामे केली आहेत त्याचे हे फळ आहे. मी दिलेला शब्द पाळत असतो. मी कुणाचेही ऐकत नाही. एकनाथ शिंदे हा शब्दाचा पक्का असून मी दिलेला शब्द पाळत असतो हे सर्वांना माहीत आहे असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
 अक्कलकोट येथे काँग्रेस पक्षाचे नेते , माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांचा शिवसेना शिंदे पक्षात पक्षप्रवेशाचा कार्यक्रम गुरुवारी रात्री पार पडला. या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बोलत होते. या कार्यक्रमास राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे , मंत्री संजय राठोड ,विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे , माजी खासदार रवींद्र गायकवाड ,मोहोळ चे राष्ट्रवादीचे आमदार राजू खरे , माजी आमदार सुभाष पाटील, माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे , शंकर म्हेत्रे , शिवसेना नेते शिवाजीराव सावंत , शिवसेना जिल्हाप्रमुख अमर पाटील ,शिवसेना नेते अमोल शिंदे , संजय कोकाटे , मोहोळचे रमेश बारस्कर ,मंगेश चिवटे, शिवसेना सचिव राम रेपाळे ,शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख महेश साठे ,  राजकुमार हिवरकर मनीष काळजे  . ,प्रियांका परांडे ,सचिन चव्हाण दिग्विजय बागल , प्रदेश प्रवक्त्या ज्योती वाघमारे झोपडपट्टी विभागाचे राज्य प्रमुख सुमित वजाळे निलेश महाराज दरेगावकर ,अनिता माळगे आदींची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलताना उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे म्हणाले  ,मला काम करणारी लोक आवडतात. आता राज्याचे माजी  गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी भगवा हातात घेतला आहे. ते आता विरोधकांचे काम तमाम करणार आहेत. माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे व त्यांचे बंधू शंकर मेहेत्रे यांची जोडी ही राम लक्ष्मणाची जोडी आहे. एक मोठे प्रस्थ असलेले म्हेत्रे घराणे आहे. म्हेत्रे परिवाराने जात धर्म पंथ कधीच पाहिला नाही. सर्वांचा पाठिंबा त्यांना मिळाला आहे .अशा कार्यकर्त्याच्या पक्षप्रवेशासाठी मला यावेच लागले आहे. जनता जनार्दनांचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहे .माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांचे मी मनापासून स्वागत करतो. अक्कलकोट नगरी ही श्री स्वामी समर्थांची पवित्र भूमी आहे. या ठिकाणी आल्यानंतर मनाला शांती मिळते. सध्या शिवसेना पक्षात लोक येत आहेत. कारवा बनत चालला आहे. म्हेत्रे यांना जनतेचा आशीर्वाद आहे. त्यामुळे त्यांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभे राहणार आहे असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केले .राज्यातील सरकार हे सर्वसामान्य जनतेचे सरकार असून सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून काम करत आहे. मी मुख्यमंत्री असताना कॉमन मॅन म्हणूनच काम केले  आहे .लाडकी बहीण योजना असो किंवा शेतकऱ्यांच्या विविध योजना असो त्यांना मदत असो हे देण्याचे काम सध्याच्या महायुतीच्या सरकारने केले आहे .महायुतीचे सरकार हे प्रगतीचे सरकार आहे . जनतेमध्ये सोन्याचे दिवस आणण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. केंद्र सरकारच्या मदतीने राज्य सरकार हे डबल इंजिन प्रमाणे काम करत आहे. सध्या राज्यात परकीय गुंतवणूक येत आहे. उद्योगधंदे येत आहेत. राज्याचा विकास हा झपाट्याने चालला आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व आम्ही सर्वजण राज्याला विकासाच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न करत आहोत. भविष्यात अक्कलकोटच्या विकासासाठी भरीव अशी निधी नक्कीच देण्याचा प्रयत्न करू शिवसेनेच्या ताकतीचा फायदा सिद्धाराम म्हेत्रे यांना होणारा होणार आहे तर सिद्धाराम म्हेत्रे यांचा फायदा शिवसेनेला होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत सर्वत्र भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही. गाव तिथे शिवसेना गाव तिथे शिवसेनेत ज्याप्रमाणे शिवसेना वाढविण्यासाठी काम करा असे शेवटी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
याप्रसंगी मार्गदर्शन करताना सिद्धाराम मैत्री म्हणाले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानावे तेवढे कमीच आहेत. आमचे म्हेत्रे   घराणे हे 1957 पासून काँग्रेस पक्षात होतो. वडिलांपासून काँग्रेस पक्षात होतो जनतेने सांगितले की आता यापुढे शिवसेना शिंदे पक्षात जाण्याचा सल्ला दिला .अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील विकासाची कामे होण्यासाठी मी शिवसेना पक्षात जात आहे. जनतेने मला शिवसेना शिंदे गटात जाण्याचा सल्ला दिला आहे .मी 68 वर्षात कधीच आम्ही पक्ष बदलला नाही पण राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे बघून शिवसेना पक्षात प्रवेश घेतला आहे. लोकांची कामे होण्यासाठी आपण शिवसेना शिंदे पक्षात प्रवेश केला आहे .उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ओळख ही लोकांसाठी झटणारा लोकांची कामे करणारा अशी आहे. त्यामुळे अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात विकासासाठी निधीची कमतरता भासणार नाही असे सांगत माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी देगाव एक्सप्रेस चे काम मंजूर आहे त्यास निधी देण्यात यावा तसेच बबलाद येथील केटी  बंधाराच्या कामासाठी निधी द्यावा. अक्कलकोट दुधनी मैंदर्गी या नगरपालिकांना शंभर कोटीचा निधी द्यावा , कुरनूर धरण परिसरात पर्यटन विकासासाठी निधी देण्यात यावा अशी मागणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केले.या कार्यक्रमाचे संयोजक सोलापूर लोकसभा संपर्कप्रमुख महेश साठे यांनी सिद्धाराम म्हेत्रे यांचे घराणे हे जनतेचे सेवेसाठी सतत कार्यरत असणारे घराणे आहे .त्यांची राजकीय वाटचाल ही 70 वर्षाची आहे. शिवसेनेत प्रवेश पक्ष घेत असताना माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी आपण केवळ जनतेसाठी पक्षप्रवेश घेत आहोत. जनतेने सांगितल्या नंतरच आपण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षात जात आहोत. अक्कलकोट येथे सभा होऊ नये म्हणून अनेकांनी प्रयत्न केले ते प्रयत्न आम्ही सर्व शिवसैनिकांनी हाणून पाडले आहेत असे यावेळी स्पष्ट केले. याप्रसंगी उपसभापती निलम गोऱ्हे शिवसेना नेते शिवाजीराव सावंत अमर पाटील अनिता माळगे प्रथमेश मेहेत्रे शंकर म्हेत्रे संजय देशमुख रमेश बारस्कर वर्षा चव्हाण सचिन चव्हाण नीलम गोरे मनीष काळजी माजी आमदार शहाजी पाटील सुमित वजाळे दिग्विजय बागल ज्योती वाघमारे मंगेश चिवटे आदींनी मार्गदर्शन केले. या पक्षप्रवेश सोहळ्यास धनेश अचलारे शिवराज मेहत्रे सद्दाम शेरीकर व्यंकट मोरे स्वामीनाथ हेगडे साहेबांना तेगिळी सूर्यकांत कडपगावकर वैशाली हावनुर वर्षा मैत्री शितल मेहत्रे ,  पंचायत समितीचे माजी सभापती आनंदराव सोनकांबळे , लाला राठोड माजी नगरसेवक विकास मोरे रईस टीनवाला  मल्लिकार्जुन काटगाव बाबासाहेब पाटील सुरेखा काटगाव आदींसह शिवसैनिक तसेच म्हेत्रे समर्थक व तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चौकट -उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांचा कार्यक्रम हा अक्कलकोट येथे  दुपारी दोन वाजता होता. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राज्यातील विविध विकासकामांच्या उद्घाटनानंतर तब्बल सात – आठ  तास उशिरा  अक्कलकोट येथे कार्यक्रमास आले. दुपारी दोन वाजण्याचा कार्यक्रम हा रात्री नऊ वाजता झाला. याबद्दल लोटांगण घालत एकनाथ शिंदे यांनी जनतेची दिलगिरी व्यक्त केली.
Previous Post

प्रवेश फॉर्म विक्रीतून पालकांची आर्थिक लूट थांबवा – भीमशक्तीची मागणी

Next Post

करमाळा येथील ” हमाल भवन ” येथे कायदेविषयक शिबिर संपन्न…

Admin

Admin

Next Post
करमाळा येथील ” हमाल भवन ” येथे कायदेविषयक शिबिर संपन्न…

करमाळा येथील " हमाल भवन " येथे कायदेविषयक शिबिर संपन्न...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (790)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (226)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157262
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697