सोलापूर

जय हिंद फूड बँकेच्या माध्यमातून सिव्हिल हॉस्पिटल मध्ये आमरस जेवण वाटप

सोलापूर ( प्रतिनिधी )
मानाचा कसबा गणपती तर्फे आयोजित करण्यात आलेल्या आंबा महोत्सव मध्ये दर वर्षी प्रमाणे आंब्यांच्या आरास करण्यात आला होता.
या महोत्सव मध्ये आरास करण्यात आलेले आंबे जय हिंद फूड बँकेस देण्यात आले, 
जय हिंद फूड बँकेच्या माध्यमातून सिव्हिल हॉस्पिटल येथे चालणाऱ्या अन्नदान महासेवेत अक्षयतृतीया व बसवेश्वर महाराज यांच्या जयंती चे औचित्य साधून आमरस चपाती भाजी भात आमटी हे जेवण वाटप करण्यात आला.
क्रांतिसूर्य,थोर समाज सुधारक जगत ज्योती महात्मा बसवेश्वर महाराज ८९४ व्या जयंती निमित्त सिव्हिल येथे अन्नदानाची महासेवा करण्यात आली.
इ स. १२ व्या शतकात महात्मा बसवेश्र्वरांनी भुकेल्यांसाठी दासोह, नावाने अन्नछत्र चालू करण्यात आले होते या माध्यमातून गरजु व भुकेल्यासाठी मोफत जेवण मिळावे ही संकल्पना त्यांच्या विचारातून सर्वात झाली याच विचाराने प्रेरित होऊन जय हिंद फूड बँक ही संस्था भूक मुक्त भारत ही चळवळ उभी केली आणि गेल्या १३ वर्षापासून अन्नदान सेवेत विविध उपक्रमातून लाखो लोकांना एक वेळचे जेवण देऊन भूक मुक्त भारत करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.जय हिंद फूड बँक संस्थेच्या माध्यमातून, सिव्हिल हाॅस्पिटलमध्ये महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या वेषभूषेत जेवण वाटप करुन अभिवादन करण्यात आले.
यावेळी प्रमुख उपस्थिती कसबा गणपतीचे उत्सव अध्यक्ष यांची पत्नी सौ गोदावरी गुरुशांत मोकाशी यांच्या हस्ते वाटप गिरीराज भोगडे, चिदानंद मुस्तारे, प्रविण वाले, संदीप जोशी, रवी भोगडे, शशांक खुने,पुष्कराज मैत्री, 
संस्थेचे संस्थापक सतिश तमशेट्टी, विपुल पुल्ली, शेखर तमशेट्टी, जय तमशेट्टी, उपस्थित होते.
महात्मा बसवेश्वराच्यां वेषभूषेत – गणेश बडगंची होते.
या वेळी संपूर्ण जेवण व आमरस हे कसबा गणपती यांच्या तर्फे उपलब्ध करण्यात आला.
सोलापूर जिल्हा व पर जिल्ह्यातील रुग्ण व त्यांचे नातेवाईक सोलापूर येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी येत असतात. 
उपचारा पेक्षा त्याच्या जेवणाचे खर्च जास्त असतात कदाचित हे खर्च जास्त असल्याने अनेक जण उपाशी झोपी जात असतात. संस्थेचे संस्थापक सतिश सुरेश तमशेट्टी यांच्या भुक मुक्त भारत या संकल्पनेतून हे उपक्रम चालू करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button