Tuesday, September 1, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

मानवी स्वातंत्र्य आणि डॉक्टर आंबेडकर

Admin by Admin
April 13, 2025
in देश - विदेश
0
मानवी स्वातंत्र्य आणि डॉक्टर आंबेडकर

Oplus_16908288

0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

विश्वरत्न ,बोधिसत्व , भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार , महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती जगभरात साजरी होत आहे .भारत देशासह जगातील अमेरिका, जपान , कॅनडा , दुबई, युरोप खंड आदीसह जगभरात  डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे करोडो अनुयायी जगभरात आहेत. जगभरात विचारांचा जागर हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी केला जातो. हे भारत देशासाठी अभिमानाची गोष्ट आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे समग्र आयुष्य हे मानवी मूल्यांची जोपासना , मानवी मूल्यांच्या उत्थानासाठी वेचले गेले आहे. जगभरातील सर्वच देशांना स्वातंत्र्य ,समता , बंधुता, एकता , सर्वधर्मसमभाव , मानवता या मानवी मूल्यांची देणगी ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिली आहे. डॉक्टर आंबेडकरांचे संपूर्ण आयुष्य हे भारतातील दिन दलित , वंचित , शोषित , पीडित , कामगार , शेतकरी , आदिवासी , ओबीसी , अल्पसंख्यांक समुदायाच्या विकासासाठी समर्पित केल्याचे दिसते. मानवी कल्याणासाठी ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्यासाठी डॉक्टर आंबेडकरांनी प्रचंड असा संघर्ष केल्याचे त्यांच्या जीवनातील अनेक घटनांवरून दिसून येते. अत्यंत संघर्ष करत डॉक्टर आंबेडकरांनी भारतातील वंचित , शोषित , दलित , मागासवर्गीय , आदिवासी ‘ ओबीसी समाजांना हक्क मिळवून दिले आहेत. पदोपदी संघर्ष ,पराकोटी चा विरोध झुगारून डॉक्टर आंबेडकरांनी कोट्यावधी नागरिकांना मूलभूत हक्क मिळवून दिले. यामुळेच डॉक्टर आंबेडकर हे भारतातील इतर नेत्यांपेक्षा उच्च कोटीचे ठरतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेमुळे जग प्रभावीत झाले आहे. भारतीय संविधान , भारतीय राजकारण ,समाजकारण , मानवी मूल्य , लोकशाही तसेच देशाची प्रगती याबाबत जगभरात नेहमी चर्चा होत असते. भारतीय राज्यघटनेमुळे देशाचा विकास भारतातील इतर राजकीय कालखंडापेक्षा हजार पटीने जास्त झाला आहे. मानवी मूल्यांची जोपासना ही भारतीय राज्यघटनेची देणगी आहे. याचे सारे श्रेय प्रज्ञावंत , प्रज्ञासूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जाते. भारतीय राज्यघटना ही नुसते कायदे कानून असलेला दस्तावेज नाही भारतीय राज्यघटना ही सर्वसामान्य भारतवासीयांचा कणा आहे. श्वास आहे. भारतीय राज्यघटनेमध्ये देशातील सर्वच घटकांना न्याय देण्याची भूमिका डॉक्टर आंबेडकरांनी केली आहे .डॉक्टर आंबेडकरांच्या राजकीय , सामाजिक , धार्मिक, आर्थिक , शैक्षणिक क्रांतीमुळेच भारतातील कोट्यावधी लोकांना त्यांचे मूलभूत हक्क मिळाले आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मानवी स्वातंत्र्यासाठी एक मोठे लढवय्ये होते. त्यांच्या विचारात, स्वातंत्र्य म्हणजे केवळ राजकीय नव्हे, तर सामाजिक, आर्थिक आणि मानसिक स्तरावरचे स्वातंत्र्य असावे, असा विचार होता. ते जात, धर्म, वर्ण यांवर आधारित भेदभावाला विरोध करत होते आणि सर्वांना समान संधी आणि हक्क मिळवून देण्याची भूमिका मांडत होते.
मानवी स्वातंत्र्यावरील डॉ. आंबेडकरांचे विचार हे प्रखर असे होते.सामाजिक स्वातंत्र्य , राजकीय स्वातंत्र्य ,मानसिक स्वातंत्र्य , धर्म स्वातंत्र्य , आर्थिक स्वातंत्र्य , आचार विचार व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य या मानवी स्वातंत्र्यानां चालना देणाऱ्या मुल्याचीं मांडणी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी जीवन भर केली.
डॉ. आंबेडकरांनी सामाजिक स्तरावरच्या विषमतेला विरोध केला. वर्णव्यवस्था, अस्पृश्यता आणि इतर प्रकारच्या सामाजिक भेदभावाला विरोध करत, ते सर्वांना समान संधी आणि हक्क मिळवून देण्याची भूमिका मांडत होते.डॉ. आंबेडकरांनी भारतीय राज्यघटनेत मूलभूत हक्कांना स्थान दिले, ज्यामुळे प्रत्येक नागरिकाला राजकीय स्वातंत्र्याची हमी मिळाली. डॉ. आंबेडकरांनी आर्थिक समानता आणि न्याय यावर भर दिला. ते सर्वांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी शिक्षण आणि रोजगारावर लक्ष केंद्रित करत होते. डॉ. आंबेडकरांनी लोकांना अंधश्रद्धा आणि रूढीवादी विचारांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला. ते लोकांना स्वतःच्या विचारांवर आणि बुद्धीवर विश्वास ठेवण्यास प्रोत्साहित करत होते.
डॉ. आंबेडकरांनी धर्माला मानवी जीवनात महत्त्वाचे स्थान दिले, पण ते धर्माला समाजातील गुलामगिरी आणि अत्याचाराचे कारण मानत नव्हते. ते असा धर्म स्वीकारायला तयार होते जो स्वातंत्र्य, समानता आणि बंधुता शिकवतो. डॉ. आंबेडकरांनी ‘मनाचे स्वातंत्र्य’ हेच खरे स्वातंत्र्य आहे, असे म्हटले आहे. म्हणजे, माणूस जर मानसिकरित्या गुलाम असेल, तर तो खऱ्या अर्थाने स्वतंत्र नसतो.
डॉ. आंबेडकरांनी मानवी हक्कांसाठी भारतीय राज्यघटनेचा मसुदा मध्ये अद्वितीय कार्य केले आहे.
डॉ. आंबेडकरांनी भारतीय राज्यघटनेचा मसुदा तयार केला, ज्यामध्ये प्रत्येक नागरिकाला मूलभूत हक्क आणि न्याय मिळवून दिला गेला. त्यांनी दलित आणि महिलांच्या हक्कांसाठी आवाज उठवला आणि त्यांच्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय प्रगतीसाठी कार्य केले. डॉ बाबासाहेब आंबेडकरानीं बौद्ध धम्म स्वीकारून, त्यांनी सामाजिक न्यायासाठी आणि मानवी हक्कांसाठी एक नवीन मार्ग निवडला.
डॉ बाबासाहेब आंबेडकरानीं शिक्षण आणि जागृतीवर भर दिला, ज्यामुळे लोकांना अन्याय आणि अत्याचारांविरुद्ध लढण्याची प्रेरणा मिळाली.
डॉ. आंबेडकर यांचे संपूर्ण आयुष्य जाति-वर्णभेद व्यवस्था आणि अस्पृश्यता यांच्याविरुद्ध उभ्या केलेल्या विद्रोहाचे एक प्रतीक होते. या व्यवस्थेने समाजातील मागास जातीच्या लोकांना आणि विशेषत: अस्पृश्य ठरवल्या गेलेल्या लोकांना अन्यायाने दडपून टाकून, त्यांचे शोषण करून, पदोपदी त्यांचा अपमान करून आणि त्यांना विविध प्रकारे असहाय्य आणि निराश्रीत करून त्यांचे जीवन उदध्वस्त केले होते. डॉ. आंबेडकरांच्या मताप्रमाणे त्यांनी या जनतेला वेगवेगळ्या जातींच्या पारंपरिक आणि अभेद्य साच्यांमध्ये इतके घट्ट बंद करून टाकले होते की, अनेक शतके या देशाची अस्मिता आणि सामर्थ्य यांच्यापुढे मोठेच आव्हान उभे राहिले होते. शिवाय या जातिपद्धतीमुळे लोकांच्या निष्ठा त्यांच्या त्यांच्या जातींच्या समजुतीत गुरफटून गेल्या आणि नैतिकतेचे निकषही जाती-जातींनुसार ठरवले गेले. त्यामुळे स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि न्याय या मूलभूत मानवी मूल्यांचा विध्वंस तर झालाच, त्याचबरोबर वरिष्ठ जातींनी सत्ता, संपत्ती, प्रतिष्ठा, मालमत्ता या सर्व गोष्टी हस्तगत करून घेऊन इतर वंचितांना आपले गुलाम बनवले. स्वत: डॉ. आंबेडकरांना अस्पृश्यता ही जुन्या रोममधील गुलामगिरीपेक्षाही भयंकर वाटत होती.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरानीं मानवी स्वातंत्र्याच्या दृष्टीने महान कार्य करून प्रत्येक माणसाला संविधानिक हक्क देण्याचे महान कार्य केले. स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि न्याय या मूलभूत मानवी मूल्यांचा प्रखरपणे समर्थन आणि मांडणी करण्याचे काम डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी केले.
त्यांच्या विचारांनी आणि कार्यांनी अनेक पिढ्यांना प्रेरणा दिली आहे. भारतातील मानवी मुल्याच्यां रक्षणासाठी, संविधानाच्या संरक्षणासाठी , अंमलबजावणीसाठी सर्वच भारतीय बांधवांनी कटिबद्ध असणे हीच डॉ बाबासाहेब आंबेडकरानां जयंती दिनी अभिवादन ठरेल. भारतीय बंधू भगिनीनी मी प्रथम भारतीय आणि अंतिम ही भारतीयच आहे या तत्वाचा अंगीकार केल्यास देशातील मानवी मुल्याच्यां जीवावर उठलेली अतिरेकीवादी धार्मिक किड संपण्यास मदत होणार आहे.

स्वामीराव गायकवाड ( पत्रकार )
अक्कलकोट जि – सोलापूर.
मो – 7385366330 ( व्हाट्सअप -9850943557)

Previous Post

न. प. वरिष्ठ प्राथमिक सेंट्रल स्कूल येथे महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त अभिवादन

Next Post

भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त त्यांच्या पुतळ्यास खासदार प्रणिती शिंदे यांनी केले  अभिवादन 

Admin

Admin

Next Post
भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त त्यांच्या पुतळ्यास खासदार प्रणिती शिंदे यांनी केले  अभिवादन 

भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त त्यांच्या पुतळ्यास खासदार प्रणिती शिंदे यांनी केले  अभिवादन 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (788)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157099
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697