शैक्षणिक

न. प. वरिष्ठ प्राथमिक सेंट्रल स्कूल येथे महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त अभिवादन

अक्कलकोट ( प्रतिनिधी ) अक्कलकोट शहरातील न. प. वरिष्ठ प्राथमिक सेंट्रल स्कूल येथे महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.
तसेच सामाजिक सप्ताह कार्यक्रमानिमित्त   पत्रकार परिषद कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. सदर कार्यक्रमास पत्रकार  स्वामीराव गायकवाड आणि  पत्रकार संघाचे डिजिटल मिडियाचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष  राजकुमार जगताप यांनी उपस्थित लावले. प्रारंभी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. पत्रकार स्वामीराव गायकवाड यांनी म.ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी  न.प.वरिष्ठ प्राथमिक सेंट्रल स्कूल व प्रमिला राजे गर्ल्स स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने दोन्ही शाळेच्या वतीने त्यांचे सत्कार करण्यात आला.यावेळी   त्यांच्याकडून विद्यार्थांना मार्गदर्शन लाभले.पत्रकार परिषदेनिमित्त विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नावर त्यांच्याकडून मार्गदर्शन लाभले. यावेळी दोन्ही शाळेतील सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते.तत्पूर्वी प्र.मुख्याध्यापक .सिध्दाराम पुजारी  यांनी प्रास्ताविक सादर केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  ज्ञानोबा केंद्रे  यांनी केले तर शेवटी संगणकतज्ञ  दलित सोनकांबळे  यांनी सर्वांचे आभार मानले. या कार्यक्रमास प्रमिला राजे गर्ल्स स्कूलचे शिक्षक . रमेश कोटगी , सविता शिंदे , शशीकला मुकणार आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button