सामाजिक

सोलापूर येथे  बहुजन क्रांती मोर्चा, भारत मुक्ती मोर्चा, राष्ट्रिय परिवर्तन मोर्चा आणि राष्ट्रीय पिच्छडा वर्ग मोर्चाच्या वतीने जेल भरो आंदोलन

सोलापूर ( रमेश सुरवसे )सोलापूर येथे  बहुजन क्रांती मोर्चा, भारत मुक्ती मोर्चा, राष्ट्रिय परिवर्तन मोर्चा आणि राष्ट्रीय पिच्छडा वर्ग मोर्चाच्या वतीने जेल भरो आंदोलन दिनांक ९ एप्रिल  रोजी संपन्न झाले. 
सदरचे आंदोलन बहुजन महापुरुषांचा सतत षड्यंत्र करून अपमान करणाऱ्या आरएसएस आणि भाजपा च्या विरोधात , केंद्र सरकारच्या वतीने ओबीसी ची जातीनिहाय जनगणना करण्याच्या समर्थनात*
लोकशाहीला धोका असणाऱ्या ईव्हीएम मशीन चा वापर करून लोकशाहीतला मताचा अधिकार शून्य करणाऱ्या एलेक्शन कमिशन च्या विरोधात ,
 बिहार गया येथील महाबोधी महाविहर ब्राह्मणाच्या ताब्यातून काढून बौद्धांच्या हाती देण्यासाठी,
वक्फ कायद्यात सुधारणा करून मुसलमानाच्या धार्मिक अधिकार वर गदा आणण्याच्या विरोधात आंदोलन करण्यात आले.
 लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौकातून डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा पर्यंत रॅली काढून शेवटी रॅली चे रूपांतर जेलभरो मध्ये करण्यात आले. यावेळी ॲड. योगेश शिदगणे (भारत मुक्ती मोर्चा जिल्हा संयोजक ),युवराज पवार ( मातंग समाज कृती समिती )
, फारुक शेख ( छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम ब्रिगेड ) , प्रशांत गायकवाड (बहुजन मुक्ती पार्टी माढा लोकसभा प्रभारी ) , भारत दळवी: भारत मुक्ती मोर्चा  तालुका अध्यक्ष , राजकमल हटकर ( लहुजी क्रांती मोर्चा जिल्हाध्यक्ष ), ॲड. तुकाराम राऊत, महेश्वर निकंबे, चंद्रकांत फडतरे, प्रशांत गायकवाड, महादेव रणधरे, महेंद्र सोनवणे, भारत दळवी, शोभा गायकवाड, धनश्री शिदगणे, मनीषा सातपुते आदी सह
 महिला आणि कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button